विकसित शहर म्हणून नगरचा लौकिक होईल- उपमहापौर गणेश भोसले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 1, 2021

विकसित शहर म्हणून नगरचा लौकिक होईल- उपमहापौर गणेश भोसले

 विकसित शहर म्हणून नगरचा लौकिक होईल- उपमहापौर गणेश भोसले

प्रभाग क्र.11 मधील सारसनगर अरिहंत कॉलनीत कॉक्रीटीकरणाचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहर विकासाचे नवे पर्व आता सुरु झाले आहे, महानगरपालिकेसह विविध योजनांच्या माध्यमातून नगर शहरात जी विकास कामे सुरु आहेत, लवकरच ही पूर्ण होणार असून, एक विकसित शहर म्हणून नगरचा लौकिक होईल. मनपात स्थायी समिती सभापती अविनाश घुले व मी उपमहापौर असल्याने यापुढील काळात शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली प्रलंबित प्रश्न मार्गी लावू. प्रभाग 11 मध्ये अविनाश घुले यांनी विविध कामांच्या माध्यमातून चांगली कामे केली आहेत. त्यामुळे प्रभागातील नागरिकांना सोयी-सुविधा मिळत आहेत. यापुढेही आम्ही बरोबरीने अशीच कामे करत राहू. ज्यावेळी रस्त्याचे काम होईल त्यावेळी नागरिकांनीच दोन्ही बाजूने वृक्ष लावावेत, त्यामुळे भविष्यात हे रस्ते खुलून दिसतील. त्याप्रमाणे प्रत्येकाने आपआपल्या परिसरात वृक्ष लागवड करुन संगोपन केल्यास नैसर्गिक ऑक्सिजन मिळेल, असे प्रतिपादन उपमहापौर गणेश भोसले यांनी केले.
प्रभाग क्र.11 मधील सारसनगर अरिहंत कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांच्या कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ उपमहापौर गणेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सभापती अविनाश घुले, गंगाधर अडसरे, अक्षय कांडेकर, रोहित खरपुडे, निवृत्ती बडे, दिलिप चंगेडिया, अशोक कानडे, सुदाम घुले, गणेश कानडे, अक्षय कांडेकर, साईनाथ मेटे, महादेव खामकर, बाळू कदम आदिंसह परिसरातील महिला उपस्थित होत्या.
याप्रसंगी सभापती अविनाश घुले म्हणाले, प्रभाग 11 मधील प्रत्येक भागात आवश्यकतेनुसार काम सुरु आहेत. नुकतेच कोठी परिसरातील ड्रेनेज, पिण्याची लाईन व इतर लाईन सिफ्टींग केल्याने भविषातील मोठा प्रश्न मार्गी लागला आहे. आता प्रभागातील अंतर्गत ड्रेनेज लाईन, पाण्याची लाईन, स्ट्रीट लाईन सह काँक्रीटीकरण करुन प्रत्येक भाग परिपूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गंगाधर अडसरे, दिलीप चंगेडिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी परिसरातील नागरिकांच्यावतीने उपमहापौरपदी गणेश भोसले यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. शेवटी अक्षय कांडेकर यांनी आभार मानले. याप्रसंगी जंकु हंबरडे, बंडू खैरे, विकास घुले, छत्रपती खैरे, आसाराम शिंदे, मिना अडसुरे, आशा खरपुडे, लंकाबाई मेटे, द्रोपदी बडे, सुरेखा कानडे, शैला सुळे, शारदा कदम आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment