25 दिवसाच्या बालकास बनविले पंढरीचा वारकरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 22, 2021

25 दिवसाच्या बालकास बनविले पंढरीचा वारकरी

 25 दिवसाच्या बालकास बनविले पंढरीचा वारकरी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
भिंगार ः आषाढी एकादशी निमित्त देवनगरीत राहणार्‍या बोरा कुटुंबातील फक्त 25 दिवसाच्या बालकास वारकर्‍यांची वेषभूषा करुन साक्षात पंढरीचा वारकरी करण्यात आले होते.यास भाविकांनी निरागस श्रीविठ्ठलदेव म्हणूनच संबोधले.
मानवी जीवनात ईश्वरी प्रेमाची अनुभूती घेऊन जीवन खर्‍या अर्थाने समृध्द करण्याचा भक्ती हा सुलभ मार्ग नेमकेपणाने सांगणारा पंढरीचा वारकरी संप्रदाय.म्हणूनच या संप्रदायात एक वारकरी म्हणून बालकावर वयाच्या अवघ्या 25 व्या दिवशीच आजोबा रसिकलाल बोरा यांनी भक्तीभावाचे सुसंस्कार सुरु केले.
सध्याच्या परिस्थितीमुळे मंदिर बंद आहेत.दर्शनासाठी कुठ जाता येत नाही.त्यामुळे आजोबांनी आपल्या नातवास वारकरी म्हणून सजवले. आई सौ.सपना व वडील वैभव बोरा यांनी आपल्या निरागस बाल वारकर्‍यातच श्रीविठ्ठल शोधला.त्याचे दर्शन घेतले.
आषाढी एकादशी निमित्त टाळ वाजवून भजन देखील म्हटले. उपवासाचे पदार्थांचा नैवेद्य दाखवला.अशा या भक्तीरसात न्हाऊन निघालेल्या बोरा कुटुंबियांच्या भक्तीभावाची चर्चा  होत आहे.याबालकाच्या भाग्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment