दोन गावे अंधमुक्त करण्याचा रोटरी क्लब मिडटाऊनचा निश्चय : प्रा. कालरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, July 22, 2021

दोन गावे अंधमुक्त करण्याचा रोटरी क्लब मिडटाऊनचा निश्चय : प्रा. कालरा

 दोन गावे अंधमुक्त करण्याचा रोटरी क्लब मिडटाऊनचा निश्चय : प्रा. कालरा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः शहरी भागा बरोबरच रोटरी क्लब मिडटाऊन ग्रामीण भागा मधील सर्वसामान्य नागरिकांना आधार देत आहे.  ग्रामीण भागातील नागरिकांना वैद्यकीय सेवा देण्या बरोबरच आरोग्यविषयक जनजागृतीसाठी रोटरी क्लब मिडटाऊन कटीबद्ध आहे. नगर तालूक्याती वडगाव सावताळ व हिंगणगाव ही दोन गावे अंधमुक्त करण्याचा निश्चय क्लबने केला आहे. त्यानुसार नगर शहरातील स्वस्तिक नेत्रालय येथील अत्याधुनिक मशिनरीद्वारे गावातील रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शास्त्रक्रिया सुरु केल्या आहेत. 51 रुग्णांवर मोतीबिंदूच्या शास्त्रक्रिया करण्यासाठी क्लबला दानशुरांची मदत मिळाली आहे, अशी माहिती रोटरी क्लब मिडटाऊनच्या अध्यक्षा प्रा.किरण कालरा यांनी दिली.
नगरच्या रोटरी क्लब मिडटाऊनच्या वतीने अंधमुक्त गाव करण्यासाठी नगर तालुक्यातील वडगाव सावताळ मधील सात गरजू रुग्णांवर नगरच्या स्वस्तिक नेत्रालय येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी क्लबच्या सचिव कल्पना गांधी, खजिनदार सतीश शिंगटे, माजी सचिव अ‍ॅड. हेमंत कराळे, दिगंबर रोकडे, पंकज वाघ, नेत्रतज्ञ डॉ. प्रफुल्ल चौधरी आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात सचिव कल्पना गांधी यांनी रोटरी क्लब मिडटाऊन करत असलेल्या सामाजिक उपक्रमची माहिती देत पुढील काळात याहून अधिक मोठे उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले. सतीश शिंगटे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here