अवयव दानाने अनेक गरजूंना नवीन जीवदान मिळणार -जालिंदर बोरुडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 22, 2021

अवयव दानाने अनेक गरजूंना नवीन जीवदान मिळणार -जालिंदर बोरुडे

 अवयव दानाने अनेक गरजूंना नवीन जीवदान मिळणार -जालिंदर बोरुडे

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः  फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी युवकांनी अवयव दानाचा संकल्प केला. सिध्दार्थनगर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित युवराज औचार, राजगुरु राजेंद्र, वसंत औचिते, विकास साळवे, राजू औचार, नवनाथ औचिते, अजय शिंदे, अर्जुन शिंदे आदी लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी अवयव दान संकल्पाचे अर्ज भरुन दिले. बोरुडे म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या कार्यातून दीन-दुबळ्यांना आधार देण्याचे कार्य केले. आज त्यांच्या विचाराने समाजात कार्य होण्याची गरज आहे. अनेक आजारांनी त्रस्त असलेले नागरिक विविध अवयवांच्या प्रतिक्षेत आहेत. भारतात अवयवदानप्रती जागृती नसल्याने अवयवदान करण्यास नागरिक घाबरतात. अवयवदान करणे ही काळाची गरज बनली असून, यामुळे अनेक गरजूंना नवीन जीवदान मिळणार आहे. मरणाताना सुध्दा पुण्य कमविण्याचा हा एकमेव मार्ग असून, नेत्रदानासह व अवयवदान चळवळ गतीमान करण्यासाठी जागृकता निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment