हद्दपार टोळी प्रमुख सागर कर्डिले सह 2 जण 15 महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 21, 2021

हद्दपार टोळी प्रमुख सागर कर्डिले सह 2 जण 15 महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार.

 हद्दपार टोळी प्रमुख सागर कर्डिले सह 2 जण 15 महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर जिल्ह्यातील संघटितपणे टोळी तयार करून गैर कायद्याची मंडळी जमवून दुखापत करणे, लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर दुखापत करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, रस्त्यात अडवून मारहाण करणे, जिल्हाधिकारी यांचे आदेशाचा भंग करणे असे गंभीर स्वरूपाचे शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे अहमदनगर शहरातील कॅम्प पोलीस स्टेशन परिसरातील हद्दपार टोळीतील टोळी प्रमुख सागर विठोबा कर्डिले वय 34 वर्षे रा.वारुळवाडी ता.जि. अहमदनगर व टोळीतील इतर दोन सदस्यांना पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातून 15 महिन्याकरिता हद्दपार केले असल्याची माहिती दिली.
सह पोलीस निरीक्षक कॅम्प पोलीस स्टेशन यांनी कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत तसेच अहमदनगर शहर परिसरातील संघटितपणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारी टोळी विरुद्ध हद्दपारीची कारवाई व्हावी यासाठी कॅम्प पोलीस स्टेशन हद्दपार टोळी प्रस्ताव तयार करून प्रस्तावामधील 4 इसमा विरुद्ध अहमदनगर जिल्ह्यातून 2 वर्षांकरिता हद्दपार करणे बाबतचा प्रस्ताव पाठविला होता.
या प्रस्तावावर मनोज पाटील हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी हद्दपार टोळी विरुद्ध कॅम्प पोलिस ठाणे हद्दीतील तसेच अहमदनगर शहर परिसरात संघटितपणे टोळी तयार करून गैर कायद्याची मंडळी जमवून दुखापत करणे, लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर दुखापत करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, रस्ता अडवून मारहाण करणे, जिल्हाधिकारी यांचे आदेशाचा भंग करणे, असे गंभीर स्वरूपाचे शरीर विरुद्धचे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. संघटितपणे गुन्हे करणार्‍या टोळीतील टोळी प्रमुख सागर विठोबा कर्डिले वय 34 वर्षे रा. वारुळवाडी ता जि अहमदनगर सचिन उर्फ लखन मंजाबापू वारुळे वय 28 रा. वारूळवाडी ता जि अहमदनगर व गणेश गोरख साठे व 29 रा. वारूळवाडी ता जि अहमदनगर यांची कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील तसेच अहमदनगर शहर परिसरात सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेच्या सुरक्षितेसाठी तसेच या टोळीची सर्वसामान्य नागरिकांमध्ये असलेली दहशत कमी करण्यासाठी तसेच टोळीच्या कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी सदर टोळीचे टोळी प्रमुख व टोळीतील नमूद 2 सदस्यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 नुसार कारवाई करून 15 महिने करिता संपूर्ण अहमदनगर जिल्हा हद्दीतून दिनांक 15/7/2021 रोजी हद्दपारीची कारवाई करून हद्दपारीचे आदेश पारित केला आहे.
या हद्दपार इसमाविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंध कारवाई देखील करण्यात आलेली होती संघटितपणे गुन्हा करणारी टोळी विरुद्ध माहिती संकलित करून विविध गुन्हेगारी टोळी विरुद्ध हद्दपार सारखे प्रतिबंधक कारवाई करणार असल्याचे संकेत मनोज पाटील यांनी दिलेले आहेत.

No comments:

Post a Comment