डॉ. विजय मकासरे ठरताहेत देवदूत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 14, 2021

डॉ. विजय मकासरे ठरताहेत देवदूत

 डॉ. विजय मकासरे ठरताहेत देवदूत

राहुरी - सध्या कोरोना महामारीने देशभर थैमान घातले आहे . राहुरी तालुक्यात सध्या शेकडोच्या घरात कोरोना बाधीत रूग्ण आढळून येत आहेत . तसेच अनेकजण मृत्यूमुखी पडले आहेत. या महामारीमुळे माणसात माणूसकी राहीली नाही. असे चित्र पहावयास मिळत आहे. अशा परिस्थितीत तालुक्यातील एक अवलीया डॉ. विजय मकासरे हे रुग्णांसाठी देवदूत ठरत आहेत.
कोरोना महामारीचा प्रसार सध्या झपाट्याने वाढत असताना राहुरी तालुक्यात रुग्ण वाढ मोठ्या प्रमाणात बाधीत होत आहे. सर्व सामान्य कुटुंबातील रुग्ण बेड व रेमडिसीवर इंजेक्शन मिळविण्यासाठी मोठी कसरत करत आहे. काही रुग्णवाहिका चालक व मालक गैर फायदा घेत अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी करून रुग्णांची आर्थिक लूट करत आहेत. अशा परिस्थितीत मात्र राहुरी तालुक्यातील एक अवलिया डॉ. विजय मकासरे हे समोर येईल त्या कोरोना बाधीत रुग्णाला विविध प्रकारच्या तपासणीसाठी नगर, राहुरी, श्रीरामपूर येथे आपल्या स्वत: चे वाहनातून पदर खर्च करून घेवून जात आहेत. राहुरी येथील एच आर सीटी मशीन बंद असल्या मुळे रुग्णांना तपासणी करण्यासाठी इतर तालूक्यात पळावे लागत आहे. अशा परिस्थितीत डॉ. विजय मकासरे हे रुग्ण कोणत्या जाती धर्माचा किंवा कोणत्या पक्षाचा आहे. हे न पाहता समोर येईल त्या रुग्णाला तन मन धनाने मदत करत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांची ही रुग्णसेवा अविरतपणे सुरू आहे. डॉ. विजय मकासरे यांच्यामुळे आज पर्यंत अनेक जणांचे प्राण वाचले असून त्या रुग्णांना डॉ. विजय मकासरे हे देवदूत वाटत आहेत. डॉ. विजय मकासरे यांचा आदर्श सामाजिक काम करणारे, व लोकांनी लोकांनी घेण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment