ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीस पदी मंगल भुजबळ यांची निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 14, 2021

ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीस पदी मंगल भुजबळ यांची निवड

 ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीस पदी मंगल भुजबळ यांची निवड


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः बहुजन विकास व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार साहेब हे पुणे येथील व्ही व्ही आय पी गेस्ट हाऊस येथे ओबीसी आरक्षण संदर्भात चर्चा करण्यासाठी आले असता तेथील छोटेखाणी कार्यक्रमात ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चा च्या प्रदेश महिला सरचिटणीस पदी मंगल भुजबळ यांना मंत्री विजय वडेट्टीवार व ओबीसी व्हीजेनटी चे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले .मंगल भुजबळ यांचे सामाजिक कार्यातील योगदान पाहून तसेच त्यांचा संघर्ष पाहून  त्यांची प्रदेश महिला सरचिटणीस पदी नियुक्ती केल्याचे मंत्री विजय  वडेट्टीवार यांनी सांगितले .ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चा चे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी महाराष्ट्र भर संघटने चे जाळे मजबूत केले असून येणार्‍या काळात ओबीसी व्हीजेएनटी वरील  होणारा अन्याय संघटना कदापि सहन करणार नसून वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून न्याय मिळवू असे बोलताना बहुजन विकास व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले यावेळी महिला प्रदेशअध्यक्ष साधना राठोड आदी सह सर्व प्रदेश पदाधिकारी तसेच अहमदनगर शहरातील माजी महापौर भगवान फुलसुंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, सुनील भिंगारे, शहर अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, विलास भुजबळ, पत्रकार राजेश सटाणकर, सुषमा पडोळे, विशाल वालकर, अभिषेक बोराटे, रमेश सानप उपस्थित होते.

No comments:

Post a Comment