भाळवणी येथे लावणी सम्राट किरणकुमार कोरेचा नृत्याविष्कार कोरोना रूग्णांनी धरला गाण्यावर ठेका; अनाथ किरणकुमार कोरेच्या अभिनयाने कोविड सेंटर मध्ये उत्साह! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, June 17, 2021

भाळवणी येथे लावणी सम्राट किरणकुमार कोरेचा नृत्याविष्कार कोरोना रूग्णांनी धरला गाण्यावर ठेका; अनाथ किरणकुमार कोरेच्या अभिनयाने कोविड सेंटर मध्ये उत्साह!

 भाळवणी येथे लावणी सम्राट किरणकुमार कोरेचा नृत्याविष्कार

कोरोना रूग्णांनी धरला गाण्यावर ठेका;  अनाथ किरणकुमार कोरेच्या अभिनयाने  कोविड सेंटर मध्ये उत्साह!

नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी :

आमदार निलेश लंके यांचे पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे सुरू असलेले  श्री. शरदचंद्र पवार साहेब आरोग्य मंदिर कोविड सेंटर येथील कोरोनाग्रस्तरुग्णांचा  मानसिकताण कमी करण्यासाठी  व त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरीताई कोठावळे यांनी  महाराष्ट्राचा लावणी सम्राट किरणकुमार कोरे यांचा जागर लोककलेचा हा विशेष लावणी कार्यक्रम रुग्णांच्या मनोरंजनासाठी ठेवला होता. यावेळी अनेक रुग्णांनी लावणीवर ठेका धरला. त्यामुळे कोविड सेंटरमध्ये आनंदमय वातावरण निर्माण झाले होते. 

   लावणी सम्राट किरणकुमार कोरे हा मूळचा नांदेड येथील असून तो अनाथ आहे. उच्चशिक्षित  असलेल्या किरणने आपल्या अंगात असलेली कला जोपासण्यासाठी  लावणी नृत्य करतो. त्याला अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. तो संपूर्ण महाराष्ट्राचा लावणी सम्राट म्हणून ओळखला जातो.  किरणकुमार कोरे हा आपल्या कार्यक्रमातून मिळणारें मानधन हे समाजातील गरीब घटकातील लोकांना देत आहे तो करत असलेले हे सामाजिक कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे. भाळवणी येथील कोविड सेंटरमध्ये त्यांनी सादर केलेली कला  कोरोना पॉझिटिव रुग्णांना  ऊर्जा देऊन गेली. कोविड सेंटरमध्ये हा कार्यक्रम करण्यासाठी किरणकुमार कोरे यांनी कोणतेही मानधन स्वीकारले नाही.   जागर लोककलेचा या विशेष लावणी कार्यक्रमामध्ये विविध गाण्यांवर रुग्णांनी व  त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सुद्धा ठेका धरला. त्यामुळे पूर्ण सेंटरमध्ये एक मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी बोलताना लावणी सम्राट किरणकुमार कोरे यांनी आमदार निलेश लंके करत असलेल्या समाजोपयोगी कार्याचे तोंड भरुन कौतुक केले. त्यांच्या या  कामाला सलाम केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके यांनी लावणी सम्राट किरण कोरे यांच्या कलेचे ही कौतुक केले व त्याला शुभेच्छाही दिल्या. या कार्यक्रमासाठी पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, सुपा जिल्हा परिषद गटाच्या सदस्या राणीताई निलेश लंके, वंदनाताई गंधाक्ते, सुपा ग्रामपंचायत सदस्या सुरेखाताई पवार, अहमदनगर महानगरपालिकेच्या अधिकारी विजयाताई काळे, सुमनताई कोठावळे, सुरेखाताई कोठावळे, मायाताई रोकडे, अक्षदा लंके, मयुरी झरेकर, आमदार निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी बाळासाहेब खिलारी, हिवरे कोरडा सरपंच दत्ता कोरडे, भाळवणी ग्रामपंचायत सदस्य नितीन मुरकुटे, तसेच आमदार निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पारनेर येथील अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


 कोठावळे कुटुंबाने स्वीकारले पालकत्व !

राष्ट्रवादी युवतीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरीताई कोठावळे यांनी आमदार लंके यांचे भाळवणी कोविड सेंटर येथे लावणी सम्राट असलेल्या किरणकुमार कोरे याला आमंत्रित केले होते. किरण हा अनाथ असून  त्याच्या पालन पोषणाची यापुढील सर्व जबाबदारी कोठावळे कुटुंबाने घेतली आहे. कार्यक्रमात राजेश्वरी कोठावळे यांच्या मातोश्री सुमनताई कोठावळे यांनी  कार्यक्रमा दरम्यान आपल्या भाषणात तसे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयाचे आमदार निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here