शैक्षणिक वर्ष २०२१-२२मध्ये श्री नागेश विद्यालयात मोफत प्रवेश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 16, 2021

शैक्षणिक वर्ष २०२१-२२मध्ये श्री नागेश विद्यालयात मोफत प्रवेश

 शैक्षणिक वर्ष २०२१-२२मध्ये श्री नागेश विद्यालयात मोफत प्रवेश 

स्थानिक स्कूल कमिटीचा विद्यार्थी हिताचा निर्णय. 
 नगरी दवंडी

 जामखेड - रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालया मध्ये सन 2021-22 साठी इयत्ता पाचवी ते दहावी सर्व विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.

   जनरल बॉडी सदस्य आमदार रोहित पवार व स्थानिक स्कूल कमिटी मार्गदर्शनाखाली कोव्हीड संसर्ग पार्श्वभूमी पाहता विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश निर्णय घेण्यात आला.

         प्रमुख उपस्थितीत स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य हरिभाऊ बेलेकर राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र सरचिटणिस राजेंद्रजी कोठारी, प्राचार्य मडके बी के ,पर्यवेक्षक हरिभाऊ ढवळे ,प्रा रमेश बोलभट,रघुनाथ मोहळकर,जगताप ए.बी.,एनसीसी प्रमुख मयुर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

        तसेच विद्यार्थ्यांसाठी रयत शिक्षण संस्थेचा रयत ऑनलाइन स्कूल एज्युकेशन हा प्रकल्प सुरू आहे , शिक्षक विविध ऍप द्वारे  ऑनलाइन तास घेत आहे. नागेश विद्यालय मध्ये गुरुकुल प्रकल्प,  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, कला- क्रीडा व शारीरिक शिक्षण उपक्रम, उत्कृष्ठ एनसीसी विभाग,डिजिटल वर्ग अध्यापन,पाचवी- आठवी शिष्यवृत्ती, सहावी-नॉर्थन टॅलेंट परीक्षा, सातवी-रयत टॅलेंट सर्च परीक्षा, आठवी- एन.एम.एम.एस परीक्षा,नववी-रयतऑलम्पियाड,

दहावी-एन.टी.एस.इ. चित्रकला ग्रेड परीक्षा,अशा सर्व स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन होत आहे व विद्यार्थी व पालकांनी या उपक्रमाचा फायदा घ्यावा असे मनोगत प्राचार्य मडके बी.के. यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment