हॉस्पिटलमध्येच ऑक्सिजन प्रकल्प. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 10, 2021

हॉस्पिटलमध्येच ऑक्सिजन प्रकल्प.

 हॉस्पिटलमध्येच ऑक्सिजन प्रकल्प.

केंद्र सरकार करणार नियम - ना. प्रकाश जावडेकर.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः डॉ.विखे पाटील फौंडेशनने कार्यान्वित केलेला ऑक्सिजन प्रकल्प ही एक चांगली सुरुवात असून, हा स्वयंपूर्ण प्रकल्प असल्याने टँकरची वाट पाहावी लागणार नाही. भविष्यात हॉस्पिटलमध्ये असलेल्या बेडच्या संख्येच्या प्रमाणात ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचा नियम सरकार करेल, देशात टंचाई निर्माण झाल्यानंतर परदेशातून ऑक्सिजन मागवावा लागला. कंटेनरची संख्याही कमी आहे, परंतू कुठेही कमी न पडता साधनांची उपलब्धता करुन ऑक्सिजन पुरविण्याचे काम केंद्र सरकारने केलेे असून विखे पाटील परिवाराने सेवेचे काम समजून हा प्रकल्प उभारण्याच्या निर्णयाचे स्वागत करीत असल्याचे प्रतिपादन माहिती प्रसारण केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज केले.
पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनमध्ये कार्यान्वित झालेल्या  स्वयंपूर्ण अशा देशातील पहिल्या ऑक्सिजन प्रकल्पाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते व्हर्चुअल रॅलीच्या माध्यमातून झाले. याप्रसंगी त्यांनी विखे परिवाराचे कौतुकही केले.
याप्रसंगी बोलताना जावडेकर म्हणाले,  कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ज्या त्रृटी प्रामुख्याने दिसून आल्या.  त्यामध्ये ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा ही समस्या सर्वांनाच भेडसावली. अनेक रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प नाहीत हे प्रामुख्याने जाणवले. त्यामुळेच ऑक्सिजनची उपलब्धता करणे हे मोठे आव्हान बनले. संकटाच्या काळातही एक हजार टन ऑक्सिजनची उपलब्धता केली. यासाठी देशातील स्टिल उद्योजक आणि औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांनीही मोठी मदत केली असुन पीएम केअर फंडातूनही आता ऑक्सिजन प्रकल्प उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यक्रमास डॉ. विखे पाटील फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, समाज प्रबोधनकार नवृत्ती महाराज इंदुरीकर, जि.प. माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, विश्वस्त डॉ. सुप्रिया ढोकणे-विखे पाटील, ड. वसंतराव कापरे,सुभाष भदगले,लेफ्टनंट जनरल डॉ. बी. सदानंदा,  डॉ. अभिजीत दिवटे, तांत्रिक संचालक डॉ. पांडुरंग गायकवाड यांच्यासह फौंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

पद्मश्री डॉ. विखे पाटील आणि आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील साहेबांनी लावलेल्या या रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर होत असताना मानवतेच्या कल्याणाचा जो विचार त्यांनी रुजविला तोच आम्ही पुढे घेवून जात आहोत. कोविड संकटात डॉ.विखे पाटील फौंडेशन आणि जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून मोठी मदत करता आली. हा ऑस्किजनचा प्रकल्प हा सेवेचाच एक भाग असून, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मोठ्या धैर्याने या संकटातून देशाला सावरले. लसीकरणाच्या माध्यमातून देश पुन्हा आत्मविश्वासाने उभा राहणार आहे. - आ. राधाकृष्ण विखे पाटील

काळाची गरज ओळखून विखे पाटील परिवार समाजासाठी काम करत असतो. सेवेची अनुवंशिकता ही त्यांच्या सर्व पिढ्यांमध्ये पाहायला मिळते. कोविडच्या संकटात या परिवाराने जिल्ह्यासाठी खुप काही केले. या सेवेतच खरे समाधान आहे. कोविडच्या संकटाला घाबरुन चालणार नाही. आत्मविश्वासानेच सामोरे जावे लागेल. - ह.भ.प इंदूरीकर महाराज.

No comments:

Post a Comment