शेतमालाच्या हमीभावाची अंमलबजावणी होऊन शेतकर्‍यांच्या कष्टाला न्याय मिळावा ः डॉ. ढगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 10, 2021

शेतमालाच्या हमीभावाची अंमलबजावणी होऊन शेतकर्‍यांच्या कष्टाला न्याय मिळावा ः डॉ. ढगे

 शेतमालाच्या हमीभावाची अंमलबजावणी होऊन शेतकर्‍यांच्या कष्टाला न्याय मिळावा ः डॉ. ढगे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः शेतकरी व शेतकर्‍यांच्या कष्टावर भारताची अर्थव्यवस्था सावरली गेली आहे असे अर्थतज्ञ मान्य करतात त्यामुळे शेतकर्‍यांच्या कष्टाला सामाजिक न्याय मिळावा शेतमालाच्या हमीभावाची अंमलबजावणी होणे देखील गरजेचे असल्याचे कृषी शास्त्रज्ञ  डॉ.अशोकराव ढगे यांनी व्यक्त केले.
सद्याच्या परिस्थितीवर बोलताना डॉ.ढगे म्हणाले की कृषी विद्यापीठ उत्पादन खर्चावर शेतमालाच्या भावाची कृषिमूल्य आयोगाकडे आकडेवारी देतात या आकडेवारीच्या आधारे कृषी मूल्य आयोग केंद्र सरकारकडे शेतमालाच्या भावाची शिफारस करतात केंद्र सरकार त्याला कमी जास्त प्रमाणात करून शेतमालाचे भाव जाहीर करतात व या हमीभावाच्या आधारे शेतकर्‍यांना त्यांच्या मालाला भाव मिळतो दिनांक 9 जून रोजी केंद्र सरकारने शेतीमालाचे हमीभाव जाहीर केले आहेत यावेळेस चांगले भाव देण्याचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल मोदी सरकार अभिनंदनास पात्र आहे गौरवोदगार डॉ.अशोकराव ढगे यांनी काढले.
यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार्यवाही याप्रमाणे करणे आवश्यक आहे यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी सर्व शेतकर्‍यांना त्याच्या मालाला हमीभावापेक्षा कमी किंमत मिळणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे वजन काटे इलेक्ट्रॉनिक असावेत मालाची प्रत व गुणवत्ता निष्कारण कमी प्रतीचे ठरू नये व शेतकर्‍यांची लूट यासाठी दक्ष राहावे लागेल,कोरोना संकट काळात सर्व व्यवसाय डबघाईला आले आहेत तथापि शेतकरी व शेतकर्‍यांच्या कष्टावर भारताची अर्थव्यवस्था सावरली गेली आहे असे अर्थतज्ञ मान्य करतात त्यामुळे शेतकर्‍यांच्या कष्टाला सामाजिक न्याय मिळावा अशी अपेक्षा डॉ.ढगे यांनी व्यक्त केली

No comments:

Post a Comment