पोलीस अधीक्षक कार्यालयातून मोटारसायकलची चोरी, पोलीस कर्मचार्‍यांना चोराचा हिसका - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, June 10, 2021

पोलीस अधीक्षक कार्यालयातून मोटारसायकलची चोरी, पोलीस कर्मचार्‍यांना चोराचा हिसका

 पोलीस अधीक्षक कार्यालयातून मोटारसायकलची चोरी, पोलीस कर्मचार्‍यांना चोराचा हिसका

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगरच्या औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या नूतन व भव्य पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातून पोलिसाचीच मोटरसायकल चोरीस गेली आहे. शहरासह जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे घरफोड्यांसह वाहन चोरांनी धुमाकूळ घातला आहे. चोरांच्या या धुमाकुळाला आवर घालण्यात पोलिसांना अपयश येत असल्यामुळेच चोरांची पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातून मोटारसायकल चोरून नेण्यापर्यंत मजल गेली आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या पार्किंगमध्ये लावलेली चाळीस हजार रुपये किंमतीची अव्हेटर दुचाकी मोटरसायकल (क्रमांक एमएच सोळा सीबी 8239) ही अज्ञात चोराने चोरून नेली. या घटनेबाबत पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या पोलिसांना कसलीच माहिती नाही. पोलिस कर्मचारी रमेश शांतवन साळवे (वय 49, नेमणूक पोलिस मुख्यालय, अहमदनगर) हे त्यांच्या शासकीय कामासाठी 2 जूनला पोलिस अधीक्षक कार्यालयात गेले असता त्यांनी त्यांची दुचाकी पार्किंगमध्ये लावली होती. काम आटोपून ते बाहेर आले असताना त्यांना त्यांची दुचाकी दिसली नाही. त्यांनी दुचाकीचा अधीक्षक कार्यालयाच्या आवारात व पार्किंगमध्ये शोध घेतला, परंतु ती मिळून आली नाही.  मध्यंतरी अन्यत्र चोरीस गेलेल्या दुचाकी पोलिस अधीक्षक कार्यालयात आणून लावून ठेवण्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. त्यामुळे चोरीस गेलेली वाहने येथे सापडणे व येथून पोलिस कर्मचार्‍याची वाहने चोरीस जाण्याच्या प्रकारांमुळे पोलिस अधीक्षक कार्यालय चर्चेत मात्र आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here