मनोबल व्यसनमुक्ती केंद्रात 15 जूनपासून प्रवेशारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 10, 2021

मनोबल व्यसनमुक्ती केंद्रात 15 जूनपासून प्रवेशारंभ

 मनोबल व्यसनमुक्ती केंद्रात 15 जूनपासून प्रवेशारंभ

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः  मनोबल व्यसनमुक्ती केंद्रात 15 जून पासून नवीन बॅच सुरू होत असल्याची माहिती स्नेहालय तर्फे देण्यात आली. दिवंगत सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयंत करंदीकर यांच्या स्मृती-प्रेरणेतून हे केंद्र गतवर्षी सुरू करण्यात आले. मानसोपचार तज्ञ डॉ. नीरज करंदीकर , यांच्या सायकॉलॉजिस्ट सौ.दीप्ती करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करंदीकर रुग्णालयाच्या सहयोगाने  हे केंद्र सक्रीय आहे . दारू,तंबाखू ,धूम्रपान ,चरस ,गांजा , कोरेक्स इत्यादी व्यसने जडलेल्या रुग्णांना 35 दिवसांचे निवासी उपचार मानसोपचार तज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्रात दिले जातात. वाजवी शुल्कात  येथे रुग्णांना प्रवेश उपलब्ध आहे. या संदर्भात आधिक माहितीसाठी 7499980845 आणि 9273935789 येथे संपर्काचे आवाहन स्नेहालय संचालित   मनोबल केंद्राने केले आहे.

No comments:

Post a Comment