अभामसाप, नगर शाखेच्यावतीने ऑनलाईन कवी संमेलनाचे आयोजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 12, 2021

अभामसाप, नगर शाखेच्यावतीने ऑनलाईन कवी संमेलनाचे आयोजन

 अभामसाप, नगर शाखेच्यावतीने ऑनलाईन कवी संमेलनाचे आयोजन

सदस्य तथा शाखा स्थापन करण्यासाठी आवाहन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद,अहमदनगर शाखेच्यावतीने महाराष्ट्रातील मान्यवर कवींचे पाच कवी आणि जगण्यावर उगवलेल्या कविता या विषयावर ऑनलाईन कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे सदस्यत्व तथा शाखा स्थापन करण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री.शरद गोरे यांनी केले आहे.
        शनिवार दिनांक 12 जून 2021 सायंकाळी साडेसहा वाजता विविध फेसबुक पेजवर आयोजित केल्या गेलेल्या या ऑनलाईन कवी संमेलनामध्ये कवी भरत दौंडकर(शिरूर,पुणे,गुणवंत शिक्षक तथा जागतिक  कवितेच्या प्रतलावरील दमदार आवाज),कवी शरद गोरे (पुणे,कवी-गीतकार तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष,अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद,शतकभर साहित्य संमेलनांचे आयोजन),कवी डॉ.अमोल बागुल (नगर, दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार),कवी नितीन देशमुख(अमरावती,जगभर कवितेचा जागर,इयत्ता आठवीच्या क्रमिक पाठ्यपुस्तकात कवितेचा समावेश), कवी अरुण पवार,(परळी,कवी,गीतकार तथा आधुनिक मराठी कवितेतील उत्तम हस्ताक्षर) हे महाराष्ट्रातील पाच कवी सहभागी होणार आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून कवी, लेखक, साहित्यिकांच्या साहित्य निर्मितीला प्रोत्साहन मिळावे व त्यांना व्यासपीठ मिळावे म्हणून भारतातील तथा जगातील मराठी भाषिक, रसिक,वाचक,प्रेक्षकांसाठी विविध कवी संमेलने,साहित्य संमेलने,परीचर्चा,परिसंवाद, साहित्यकृतींसाठी पुरस्कार,पुस्तक निर्मिती,ग्रंथप्रकाशन, ऑनलाइन साहित्यिक कार्यक्रम आदी विविध उपक्रम राबवले जातात.       गाव,तालुका,जिल्हा तथा राज्य पातळीवर सदस्य होण्यासाठी तथा शाखा स्थापन करण्यासाठी इच्छुकांनी श्री.शरद गोरे यांच्याशी 9422 300 362 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
कविसंमेलन पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी खालील फेसबुक पेज च्या लिंक ओपन करून पाहू शकता.

No comments:

Post a Comment