टच फौंडेशन, जितो अहमदनगरतर्फे आ. जगतापांच्या वाढदिवसानिमित्त 1100 झाडे लावण्याचं अभियान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 12, 2021

टच फौंडेशन, जितो अहमदनगरतर्फे आ. जगतापांच्या वाढदिवसानिमित्त 1100 झाडे लावण्याचं अभियान

 टच फौंडेशन, जितो अहमदनगरतर्फे आ. जगतापांच्या वाढदिवसानिमित्त 1100 झाडे लावण्याचं अभियान


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः करोनाच्या दुसर्या लाटेत ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवला. निसर्गात मुक्त मिळणारा ऑक्सिजन किती अनमोल आहे याचे महत्त्व सर्वांच्या लक्षात आले आहे. जास्तीत जास्त  वृक्ष लागवड हाच नैसर्गिक ऑक्सिजन निर्मितीचा उत्तम पर्याय आहे.  याच पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनासाठी गौतम मुनोत यांनी ’एक झाड आपल्या प्रियजनांसाठी’ हा अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. त्याला लवकरच चळवळीचे रूप येऊन पर्यावरण संवर्धन होण्यास निश्चितच मदत होईल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
आ.संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त जितो अहमदनगर, टच फौंडेशन व चंद्रकांत मुनोत फौंडेशनने ’एक झाड आपल्या प्रियजनांसाठी’ अंतर्गत 1100 झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आ.जगताप यांच्या हस्ते अमित मुथा यांच्या पेट्रोल पंपावर ग्राहकांना रोपं देऊन करण्यात आला. यावेळी जितो अहमदनगरचे अध्यक्ष अमित मुथा, सेक्रेटरी प्रितेश दुगड, सुरेश कांकरिया, विजय गुगळे, आलोक मुनोत, गौतम मुथा, सचिन मुनोत, पुनित भंडारी, तुषार कर्नावट, ऋषभ बोरा, मयूर गांधी, प्रशांत बोगावत, विराज मुनोत आदी उपस्थित होते.
अमित मुथा यांनी सांगितले की, आ. संग्राम जगताप हे नेहमीच युवा वर्गाला समाजपयोगी कामांसाठी प्रेरित करतात. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड उपक्रम सुरू केला आहे. पेट्रोल पंपावर येणार्या ग्राहकांना रोपं देऊन ते आपल्या घराजवळ, परिसरात लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात चिंच, आवळा या झाडांची 100 रोपं देण्यात आली आहे. उर्वरित 1000 विविध झाडांची रोपे विविध भागात वितरित करण्यात येणार आहेत. संपूर्ण नगर शहर व परिसर हरित व्हावे, रोपं लावताना प्रत्येकाने ते आपल्या प्रियजनांच्या स्मृती प्रमाणे जपावे हीच अपेक्षा आहे.शेवटी प्रितेश दुगड यांनी आभार मानले

No comments:

Post a Comment