इतर जिल्ह्यांप्रमाणे नगर मध्येही लॉकडाऊनमध्ये सूट द्यावी : खा. विखे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, June 4, 2021

इतर जिल्ह्यांप्रमाणे नगर मध्येही लॉकडाऊनमध्ये सूट द्यावी : खा. विखे

 इतर जिल्ह्यांप्रमाणे नगर मध्येही लॉकडाऊनमध्ये सूट द्यावी : खा. विखे

भाजप व्यापारी आघाडीच्या शिष्ठमंडळाची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः एप्रिल महिन्यापासून नगर शहरात सुरु असलेल्या लॉकडाऊन मुळे सर्व व्यापारी व दुकानदार अडचणीत आले आहेत. दुकाने बंद असली तरी दुकानदारांचा व व्यापार्‍यांचा दैनदिन खर्च चालूच असल्याने व्यापारींचे कंबरडे मोडले आहे. आता नगर मधील परीस्थित सुधारत असून दैनदिन रुग्णांच्या संख्याही कमी होत आहे. राज्य सरकारने इतर जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनमध्ये सूट दिली आहे. या जिल्ह्यांप्रमाणे नगर मध्येही लॉकडाऊन मध्ये सूट द्यावी व तातडीने बाजारपेठ खुली करावी, अशी मागणी खा. सुजय विखे यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेवून केली.
नगर शहर भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्या वतीने खा.सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली विविध व्यापारींच्या शिष्ठमंडळाने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची कार्यालयात भेट घेवून नीवेदन दिले. यावेळी जेष्ठ नेते वसंत लोढा, शहर व्यापारी आघाडीचे अध्यक्ष विलास गांधी, सराफ सुवर्णकार संघटनेचे जिल्ह्याध्यक्ष संतोष वर्मा, माजी सरचिटणीस अनिल गट्टानी, ऑटोमोबाईल असोसिएशनचे चेतन जग्गी, संतोष गांधी, सलून असोसिएशनचे सुनील निकम,लक्ष्मिकांत हेडा, नितीन गांधी, सावेडी व्यापारी असोसिएशनचे मंगेश निसळ व अमित गटणे आदी पदाधीकारी व व्यापारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी पुढील सोमवारी पुन्हा शहराचा सर्वे करून सहानुभूतीने निर्णय घेवू असे आश्वासन शिष्ठमंडळास दिले.
यावेळी वसंत लोढा म्हणाले, बाजारातील दुकाने उघडण्यास परवानगी दिल्यावर शहरातील व्यापारी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून आपला व्यवसाय करतील. जर कोणी नियमांचे उल्लंघन केल्यान प्रशासनाने त्यांच्यावर कडक कारवाई करावी.संतोष वर्मा म्हणाले, सर्वसामान्य नागरिक लॉकडाऊन मुळे संकटात असल्याने त्यांना सहकार्य करण्यासाठी  सराफ सुवर्णकार व्यावसायीक दिवसातील काही तास दुकाने उघडण्यास त्वरित परवानगी द्यावी अशी मागणी करत सर्फ व्यावसायिकांचे प्रश्न मांडले.विलास गांधी म्हणाले, गेल्या दोन महिन्यापासून सुरु असलेल्या लॉकडाऊन मुळे शहरातील व्यापारींचे कंबरडे मोडले आहे. भारतीय जनता पार्टीने या आधीही आपल्या निवेदना द्वारे बाजारपेठ सुरु करण्याची विनंती केली होती. प्रशासनाने व्यापारींच्या मागणीची सहानुभूतीने विचार करावा, अशी विंनती केली.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, सुमारे 2 महिन्यापासुन टाळेबंदी असल्याने व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. दुकान बंद आहे, पण दैनदिन कायमस्वरुपी खर्च मात्र चालू आहे. उदा मासिक विज बील कामगारांचे पगार सर्व प्रकारचे कर कर्जाचे हप्ते व त्यावरील व्याज, मालकाचा स्वतःच कौटुंबिक दैनंदिन खर्च वैद्यकीय खर्च अशा विविध खर्चाचा सामना करावा लागत आहे. याबाबत शासनाने इतर समाजघटकांना काही सवलती आणि शासकीय सहाय्य दिलेले आहे. परंतु व्यापारी वर्गाला कोणतेही सहाय्य मिळाले नाही. सुमारे 80% व्यापारी हा छोटा वर्ग आहे. त्यामुळे ते अत्यंत हतबल झालेले आहे.अशावेळी दुकान उघडण्याशिवाय आमच्यापुढे पर्याय उरलेला नाही. आपल्यानियमाच्या आणि अटीचे तंतोतंत पालन करणारा हा व्यापारी वर्ग आहे. यापुढेही शासनाने सर्वतोपरी सहकार्य करण्याची आमची भुमिका राहिल म्हणुन शासनाने आमची कुटुंबेस्थिर राहतील व कोणावरही आत्महत्या करण्याचा प्रसंग येणार नाही याची काळजी घ्यावी.
महाराष्ट्रातील बहुतेक जिल्हे सकाळी 7 ते 2 या वेळेमध्ये चालू झालेले आहेत तसेच नगर जिल्हयातील बहुतेक तालुके चालू आहेत. राज्य सरकारच्या नियमावलीनुसार 10 टक्के पेक्षा बाधीतांची संख्या कमी झालेली आहे. तसेच ऑक्सीजन बेड हे 40% पर्यन्त जवळजवळ आलेले आहे. त्यासाठी 3 जुन पासुन सर्त दुकानांना वेळेची मर्यादा घालुन नियमाचे बंधन घालुन दुकाने चालू करण्यास परवानगी द्यावी. आर्थिक चकाला गती देण्यासाठी आता याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. म्हणुन आमचे तळतळी निवेदन आहे की, त्वरीत सर्व प्रकारचे दुकाने व व्यापार खुला करावा आपण एकत्रितपणे या संकटाचा मुकाबला आजपर्यन्त केला व यापुढेही करु तेव्हा आमच्या या कळकळीच्या विनंतीचा अत्यंत सहानुभुतीपुर्वक विचार करावा.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here