नेप्ती उपबाजारात कांदा लिलाव सुरू - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 4, 2021

नेप्ती उपबाजारात कांदा लिलाव सुरू

 नेप्ती उपबाजारात कांदा लिलाव सुरू

पहिल्याच दिवशी 19 हजार 760 कांदा गोण्यांची आवक


अहमदनगर ः
शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग मोठया प्रमाणात वाढु लागल्याने दि.25 मार्च पासुन नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात सुरू असणारा कांदा बाजार बंद करण्यात आला होता. कांदा बाजार बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांना कांदा साठवणुकीची मोठी अडचण निर्माण झाली होती. अवकाळी व मान्सुन पुर्व पावसाने अनेक शेतकर्‍यांचा कांदा शेतातच भिजुन खराब झाला. यामुळे कांदा बाजार सुरू करण्याची शेतकर्‍यांची मागणी सुरू झाली होती.जिल्ह्याधिकार्‍यांच्या आदेशानुसार बंद असलंला कांदाबाजार काल पासुन सुरू झाला आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने नेप्ती उपबाजार येथे एक महिन्यानंतर फळे व भाजीपाला बाजार सुरू करण्यात आला. मात्र कांदा बाजार सुरू करण्याचे आदेश नव्हते.  त्यानंतर दोन दिवसापुर्विच नेप्ती उपबाजार समितीत सकाळी 7 ते 11 या वेळात कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून कांदा लिलाव सुरू करण्याचे आदेश प्रशासनाने काढले. यानुसार बाजार समितीने गुरुवारपासून कांदा लिलाव सुरू केले आहेत. मात्र त्यासाठी काही निर्बंध घालुन देण्यात आले आहेत. कांद्याची आवक लिलावाच्या आदल्या दिवशी नेप्ती उपबाजार येथे सकाळी 7 ते 11 या वेळेत उतरवीली जाते.एका वाहनासोबत एकाच शेतकर्‍याला प्रवेश देण्यात येत असुन त्याची आरोग्य तपासणी करूनच त्याला आत सोडले जात आहे. शेतकर्‍यांना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले असुन नियम न पाळणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश सचिव अभय भिसे यांनी कर्मचार्‍यांना दिले आहेत. पहिल्या दिवशी जवळपास 10 हजार 868 क्विंटल कांदा गोण्यांची आवक झाली. एक नंबरच्या कांद्याला 1800 ते 2100 रूपये भाव मिळाला . दोन नंबरच्या कांद्याला 1050 ते1800 रुपये भाव मिळाला. तीन नंबरच्या कांद्याला 600 ते 1050 रूपये तर चार नंबर कांद्याला 300 ते 600 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. तसेच कोरोना मुळे दोन महिने बंद असलेला नगरच्या मार्केट यार्डमधील भुसार (अन्नधान्य)चा बाजार ही आजपासुन बाजार समितीने सुरू केला आहे. यात 394 क्विंटल अन्नधान्याची आवक झाली.  येथे येणार्‍या सर्व घटकांनी कोविडच्या नियमांचे पालन करावे असेआवाहन सभापती अभिलाष घिगे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment