कोरोना काळात लहान मुलांसाठी घ्यावयाच्या काळजी यावर डॉ.संदिप गायकवाड यांचे ऑनलाईन मार्गदर्शनास उत्स्फुर्त प्रतिसाद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 12, 2021

कोरोना काळात लहान मुलांसाठी घ्यावयाच्या काळजी यावर डॉ.संदिप गायकवाड यांचे ऑनलाईन मार्गदर्शनास उत्स्फुर्त प्रतिसाद

 कोरोना काळात लहान मुलांसाठी घ्यावयाच्या काळजी यावर डॉ.संदिप गायकवाड यांचे ऑनलाईन मार्गदर्शनास उत्स्फुर्त प्रतिसाद

अहमदनगर ः सध्याच्या कोविड-19 च्या काळामध्ये लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रसार वाढत चाललेला असून, यावर घ्यावयाची काळजी, लक्षणे, संसर्ग, यावर प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.संदिप गायकवाड यांनी नुकतेच ऑनलाईनद्वारे मार्गदर्शन केले. अ.ए.सोसायटीच्या आध्यापक विद्यालयाच्यावतीने कोरोना काळात जनजागृती करण्यासाठी या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हजारोच्या संख्येने नागरिकांनी या ऑनलाईन मार्गदर्शनाचा फायदा घेतला. अ.ए.सो.च्या अध्यापक विद्यालयाच्यावतीने कोविड-19 साठी प्रतिबंध करणे, गरजूंना मदत करणे, रुग्णांना जरुरीचे साहित्य वाटप करणे, त्यांना मानसिक आधार देणे तसेच लसीकरण करुन घेणे यासारखे उपक्रम सध्या राबविण्यात येत आहेत. केंद्र सरकारच्या व्हेंटल पुरस्कृत उपक्रमांतर्गत हा सामाजिक उपक्रमाचे आयोजन सुरु असून, त्यावर मान्यवरांचे व्याख्याने  गुगल मीटद्वारे आयोजन करुन प्रबोधन व जनजागृतीचे कार्य सुरु आहे.
डॉ.संदिप गायकवाड बोलतांना म्हणाले की, या कोरोनाच्या काळामध्ये लहान मुलांच्या आहारामध्ये कोणते घटक असावे, पालकांनी त्यांची मानसिकता समजून घ्यावी, त्यांच्याशी सुसंवाद कसा असावा, जेणेकरुन त्यांचा विकास अधिकाधिक होण्यास व त्यांची प्रतिकारशक्ती वाढण्यास याचा फायदा होईल, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर डॉ.हेमा सेलोत यांचे योगा व त्याचा फायदा या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी अ.ए.सोसा.च्या प्रमुख कार्यवाह श्रीमती छायाताई फिरोदिया व संस्थेच्या पदाधिकार्यांचे सहकार्य लाभले. तसेच आध्यापक विद्यालयाचे प्राचार्य एस.एस.उबाळे, व्हेंटल विभागाचे प्रमुख श्रीमती रघुवंशी, नवीन मराठी शाळा व विश्रामबागच्या मुख्याध्यापिका श्रीमती गांगर्डे, किशोर संस्कृत संवर्धिनी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.गोयल, अध्यापक विद्यालयाचे प्रथम वर्ष व द्वितीय वर्षाच्या छात्र ज्ञानेश्वरी काळे, तेजश्री कोळी, किर्ती गुंड, दिपा जोशी, गणेश खोकले, योगेश जावळे, अनिकेत बचाटे, पुजा खडके, खुशी गुप्ता, कांचन गोलांडे आदि छात्र अध्यापकांनी या कोरोना जनजागृतीमध्ये उत्स्फुर्त आपला सहभाग नोंदविला. एस.एस.उपासनी आभार मानले. या यशस्वीतेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल जिल्हा प्रशिक्षण संस्था संगमनेर कॉलेजचे प्राचार्य डी.डी.सूर्यवंशी यांचे विशेष सहकार्य लाभले. हा उपक्रम राबवित असल्याबद्दल प्रा.टिळेकर व प्रा.पांढरे यांनी कौतुक करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment