वृक्षमित्र यांच्या सहकार्यातून हरित केडगाव करण्याचा संकल्प- मनोज कोतकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 12, 2021

वृक्षमित्र यांच्या सहकार्यातून हरित केडगाव करण्याचा संकल्प- मनोज कोतकर

 वृक्षमित्र यांच्या सहकार्यातून हरित केडगाव करण्याचा संकल्प- मनोज कोतकर


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  केडगाव हे नगर शहराचे एक मोठी उपनगर आहे याउपनगराच्या विकासा बरोबरच वृक्षमित्र यांच्या सहकार्यातून हरित केडगाव करण्याचा संकल्प केला आहे. उद्योजक सतिष शिंदे यांच्या पत्नी कै. शारदाताई शिंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प हाती घेतला आहे.आज केडगाव देवी परिसरामध्ये 151 झाडे व 5 वट वृक्ष लावण्यात आले आहे. वृक्षारोपण चळवळ ही लोक चळवळ व्हावी यासाठी केडगावकरांनी पुढे यावे वृक्षारोपणाची जबाबदारी नुसते झाड लावण्यापुरते नसून तर त्याचे संगोपनही झाले पाहिजे असे मा.स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर यांनी व्यक्त केले.
जनता आधार बहुउद्देशीय संस्था व सतीश शिंदे यांच्या संयुक्त विद्यमानाने केडगाव देवी परिसरामध्ये वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले यावेळी मा.स्थायी समिती सभापती मनोज कोतकर, उद्योजक आठरे, विनायक गरड, अनिल पवार, व्यंकटेश आठरे, जनता आधारचे अध्यक्ष अजित कोतकर, बच्चन कोतकर, गांधी साहेब, शाम कोतकर, कोंडीराम वीरकर, संकेत बढे, प्रतीक कोतकर, बालू कोतकर, रणजित ठुबे, साजिद शेख, नितीन ठुबे, ओंकार कोतकर, अतुल कोतकर  तसेच जनता आधार बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना सतीश शिंदे म्हणाले की, समाजामध्ये वृक्षारोपणाचे महत्व कळने गरजेचे आहे यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण मोहीम राबवावी. शिंदे कुटुंबीयांनी वृक्षारोपण व संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली असून प्रत्येक वर्षी वृक्षाची लागवड केली जाते, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धनाची खरी गरज आहे असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना अजित कोतकर म्हणाले की,जनता आधार बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांमध्ये वृक्षारोपण व संवर्धनाची चळवळ हाती घेतली आहे. उद्योजक नरेंद्र फिरोदिया याच्या आय.लव्हच्या माध्यमातून केडगाव परिसरामध्ये 100 झाले लावण्यात आली त्यापैकी 90 झाडे चांगली वाढली आहेत व त्या झाडांची योग्य निगा राखली जात आहे. याचबरोबर डॉक्टर असोसिएशनच्या वतीने 50 झाडे दिली त्यापैकी 45 झाडे जगली असून त्याचे योग्य संगोपन होत आहे. आज उद्योजक सतिष शिंदे यांनी 151 झाडे देऊन जनता आधार फाउंडेशनला सहकार्य केले असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment