महाराष्ट्र शासन अनुसुचित जाती-जमाती आयोगावर तात्काळ नियुक्त्या करा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमची मागणी
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महाराष्ट्र शासन अनुसुचित जाती-जमाती आयोगावर अध्यक्ष व सदस्य यांच्या तात्काळ नियुक्त्या करण्यात याव्यात. अशी मागणी.ना.डॉ. नितीन राऊत ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य तथा राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटि अ.जा.वि.यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीने करण्यात आली. ना.राउत जिल्हा दौर्यावर होते. शासकीय विश्रामगृह येथे भेट घेवुन फोरमचे जिल्हाध्यक्ष संजय भोसले , जिल्हा उपाध्यक्ष उमेश साठे यांनी नामदार नितीन राउत यांना निवेदन दिले. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष श्री राजेशजी लाडे, श्रीरामपुर मतदार संघाचे आमदार मा.श्री. लहुजी कानडे, जिल्हा काँग्रेस समन्वयक मा.श्री.ज्ञानदेव वाफारे, मा.हेमत ओगले, बीड जिल्हा फोरम चे अध्यक्ष श्री. यशवंतराव खंडारे जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष श्री. किरण काळे, जिल्हा काँग्रेसचे एस.सी.वि अध्यक्ष श्री. राजेंद्र वाघमारे, काँग्रेस प्रदेश समन्वयक एस.सी.मा.नामदेव चादणे,शहर जिल्हा काँग्रेसचे एस.सी.वि अध्यक्ष मा.नाथाभाऊ आल्हाट, रखमा भाऊ श्रिरसागर, ऊर्जा विभागाचे मुख्य अभियंता मा.सागंळे, कार्यकारी अभियंता मा.जमथडे, फोरमचे संचिव मा.प्रकाश भिंगारदिवे, व आदी उपस्थीत होते.
No comments:
Post a Comment