लसीकरण केंद्रात ‘बर्थडे सेलिब्रेशन!’ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 2, 2021

लसीकरण केंद्रात ‘बर्थडे सेलिब्रेशन!’

लसीकरण केंद्रात ‘बर्थडे सेलिब्रेशन!’

महिला कर्मचार्‍यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः “एक हसी ना थी” या गाण्यावर आरोग्य अधिकार्‍याचे नाचणं हा चर्चेचा विषय असताना कोरोना लसीकरण केंद्रावर ‘बर्थडे सेलिब्रेशन’ करण्यात आल्याचं समोर आलं आहे. कोरोना नियमांना पायदळी तुडवत मुकुंदनगर आरोग्य केंद्रातील महिला कर्मचार्‍यांचा वाढदिवस साजरा झाल्याचा प्रकार मनसे सचिव नितीन भुतारे यांनी उघडकीस आणला आहे. प्रशासनाने आरोग्य अधिकार्‍यांना या संदर्भात नोटिसा काढूनही असे प्रकार होणं धक्कादायक असल्याचे दिसून येत आहे.
महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांचा वाढदिवस सेलिब्रेशनमधील गाण्याची मैफिल वादाच्या भोवर्‍यात सापडला. महापालिका प्रशासनाने बोरगे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यांना खुलासा करण्याचे आदेशही दिलेत. हे प्रकरण ताजे असतानाच आता नगर शहरातील मुकुंदनगर लसीकरण केंद्रावर पुन्हा एकदा वाढदिवसाचा उत्सव साजरा झाल्याचे समोर आले आहे. मुकुंदनगरमधील लसीकरण केंद्रात एका महिला कर्मचार्‍याचा वाढदिवस साजरा होत असल्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. हा वाढदिवस साजरा करताना सोशल डिस्टंसिंग नियमाचे पालन करण्यात आलेले दिसत नाही. एकाही महिला कर्मचार्‍यांच्या तोंडाला मास्कही नाही. नितीन भुतारे हे महापालिका आयुक्तांकडे तक्रार करणार आहेत. आयुक्त त्यावर कारवाई साठी नोटीस बजावणार की नाही हे एक दोन दिवसात स्पष्ट होणार आहे.

No comments:

Post a Comment