स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत महत्त्वाचे विषय मंजूर होणार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 24, 2021

स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत महत्त्वाचे विषय मंजूर होणार.

 स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत महत्त्वाचे विषय मंजूर होणार.

उद्या मनपात 2 ऑनलाईन सभा.



नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः उद्या स्थायी समितीची ऑनलाईन सभा व महापौर बाबासाहेब वाकळे यांचे कार्यकाळातील शेवटची ऑनलाईन सर्वसाधारण सभा अशा दोन सभा पार पडणार आहेत.
महापौरांची विशेष सर्वसाधारण सभा - महापौर बाबासाहेब वाकळे यांनी त्यांच्या कार्यकाळातील व शेवटची सर्वसाधारण सभा उद्या 25 जून ला दुपारी एक वाजता ऑनलाईन द्वारे आयोजित केली आहे. या सभेत एकूण 7 विषय आहेत. यात सावेडी येथील सावित्रीबाई फुले भाजी मार्केटमध्ये स्थापत्याची कामे करून एम. आर. आय. मशीन कार्यान्वित करणे, पिंपळगाव माळवी येथील जागेत अत्याधुनिक सोयी सुविधांसह प्रकल्प विकसित करणे हे विषय या सभेत मांडले जाणार आहेत.  महापालिका महापौर निवडीच्या आधीच ही सभा उरकण्याचा घाट महापौरांकडून घाईघाईने घातला जात आहे.
स्थायी समिती ऑनलाईन सभा - स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी 25 जून ला स्थायी समितीची विविध विषयांसाठीची हि ऑनलाईन सभा दुपारी बारा वाजता आयोजित केली आहे. यात सावेडी येथील हायब्रीड शवदाहिनी बसविणे व कार्यान्वित करणे, शहरातील विविध ठिकाणी लहान मुलांसाठी उद्यान विभागामार्फत खेळणी साहित्य खरेदी करणे, घनकचरा व्यवस्थापन विभागाकरिता लागणारी जंतुनाशक द्रवे, कीटकनाशके , पावडर तसेच आवश्यक साहित्यांचा पुरवठा करणे, यांसह विविध विषयांसाठीची हि सभा होणार आहे.
दि. 30 जून रोजी पहिल्या महापौर पदाचा कार्यकाळ संपत असल्यामुळे नव्याने महापौरपदाची निवडणूक होणार आहे. आगामी महापौर पद अनुसूचित जाती महिला या प्रवर्गाकरिता निश्चित करण्यात आलेले आहे. नाशिक विभागीय आयुक्तांकडे नव्या महापौर पदाच्या निवडीकरिता प्रस्ताव येथील प्रशासनाने पाठवलेला होता. त्या प्रस्तावास मंजुरी मिळाली असून येत्या 30 जूनला या पदांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment