“म्युकर मायक्रोसिस” उपाययोजनांसाठी तज्ञ डॉक्टरांची मनपात बैठक. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 24, 2021

“म्युकर मायक्रोसिस” उपाययोजनांसाठी तज्ञ डॉक्टरांची मनपात बैठक.

 “म्युकर मायक्रोसिस” उपाययोजनांसाठी तज्ञ डॉक्टरांची मनपात बैठक.

उपाययोजनांसाठी मनपा सज्ज! - डॉ सागर बोरुडे.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः म्युकर मायक्रोसिसचे रुग्ण शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळत आहेत त्यांना उपचारासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. दुसर्‍या कोरोनाच्या लाटेमुळे म्युकर मायक्रोसिसचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळले आता तज्ञांच्या मते तिसरी लाट येणार आहे या लाटेमध्ये सर्वाधिक दुष्परिणाम लहान मुलांवर होणार आहे व त्या लाटेचा संसर्ग देखील मोठ्या प्रमाणात होईल असे तज्ञांच्या मते बोलले जाते यासाठी अहमदनगर महापालिका उपाययोजना करण्यासाठी सज्ज आहे.म्युकर मायक्रोसिसच्या रुग्णांची हेडसाळ कशी थांबवता येईल यासाठी आ.संग्राम जगताप यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे पाठपुरवठा करून जिल्हा रुग्णालय येथे म्युकर मायक्रोसिस वर उपचार करणार्‍या तज्ञ डॉक्टरांची टीम तयार करण्यासाठी पाठपुरवठा करणार असल्याचे नगरसेवक डॉ सागर बोरूडे यांनी सांगितले.
म्युकर मायक्रोसिस आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मनपा आरोग्य समिती व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने कान,नाक,घसा तज्ञ व डेंटल सर्जन यांची संयुक्त बैठक संपन्न झाली या वेळी समितीचे अध्यक्ष डॉ.सागर बोरुडे बोलत होते.
महापालिकेच्या माध्यमातून म्युकर मायक्रोसिसेच्या रुग्णांच्या उपचारासाठी महापालिकेच्या महासभेत 50 हजारांची आर्थिक मदत शहरातील प्रत्येक रुग्णाला मिळावी यासाठी पाठपुरवठा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीत शहरातील डॉक्टरांनी मुकर मायक्रोसेस आजारा संदर्भात विविध उपाय योजना सुचविल्या आहेत यामध्ये म्युकर मायक्रोसेस हा आजार कोरोना पेक्षा भयंकर असून जीवघेणा आहे या आजाराचे रुग्ण राज्याच्या तुलनेत नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळत आहेत या आजार संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती होने गरजेचे आहे,नागरिकांनीही या आजाराचे लक्षण आढळल्यास तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधावा. कोरोना मधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये ही लक्षणे मोठ्या प्रमाणात आढळत आहेत सद्या म्युकर मायक्रोसेस आजाराच्या उपचारासाठी इंजेक्शनची गरज मोठ्या प्रमाणात भासत आहे परंतु इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे तरी इंजेक्शन उपलब्ध करून द्यावेत याचबरोबर विविध उपाययोजना डॉक्टरांनी सुचविल्या.
यावेळी उपायुक्त यशवंत डांगे,समितीचे सदस्य सचिन जाधव,निखिल वारे,संजय ढोणे,सतीश शिंदे, नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, बाळासाहेब पवार,मनपा आरोग्य अधिकारी डॉ.सतीष राजूरकर, डॉ.गजानन काशीद,डॉ.धनंजय कुळकर्णी,डॉ.संजय आसनांनी,डॉ.योगेश बुधानी,डॉ.मंगेश जाधव,डॉ.राहुल आनंद,डॉ.विजयनाथ गुरुवाले आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment