आ. संग्राम जगतापांचा नवा सर्वपक्षीय सत्ता पॅटर्न ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, June 24, 2021

आ. संग्राम जगतापांचा नवा सर्वपक्षीय सत्ता पॅटर्न !

 आ. संग्राम जगतापांचा नवा सर्वपक्षीय सत्ता पॅटर्न !

अहमदनगर महानगरपालिकेत धावणार ‘सहमती एक्सप्रेस’...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर महापालिकेच्या महापौर पदाच्या सारीपाटातील सत्तासंघर्ष चौरंगावरील चार कोनासारखा चार प्रमुख राजकीय पक्षातील शिवसेन, राष्ट्रवादी भाजपा, काँग्रेस या एकमेकांविरुद्ध लढलेल्या सत्तेच्या डावपेचातून अनेक वर्ष शत्रुत्व अंगिकारणार्‍या या पक्षांना एकत्र आणण्याचा नवा सर्वपक्षीय सत्ता पॅटर्न आ. संग्राम जगताप राबविणार असल्याचे संकेत मिळत आहेत. महापौरपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीचा नवा मित्र शिवसेना होत असला, तरी जुना मित्र भाजपालाही बरोबर घेण्याचे नवे समीकरण आखत आहेत. अनेक वर्षांपासूनचा शिवसेना राष्ट्रवादी मधील संघर्ष या महापौरपदाच्या निमित्ताने संपुष्टात आला असे आता म्हणावे लागेल.
शिवसेनेकडे महापौर व सभागृहनेता, राष्ट्रवादीकडे उपमहापौर व स्थायी समिती, भाजपाकडे विरोधी पक्षनेतेपद, काँग्रेसकडे महिला बाल कल्याण सभापती, बसपाकडे उपसभापती असा सर्वपक्षीय सत्ता पॅटर्न राबविण्याचा आ. संग्राम जगताप यांचा विचार असून आगामी विधानसभा निवडणुकीचे गणित म्हणूनही याकडे पाहिलं जात आहे. या महापौरपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आ.जगताप आणि शिवसेनेचे सत्तेचे समीकरण जुळले आहेत. महापालिकेतील या सहमती एक्सप्रेस मधून नगरचे राजकारण पुढील काळात कोणत्या दिशेने जाणार आहे हे स्पष्ट होणार आहे.
नगर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व शिवसेना ही महाविकासआघाडीतील घटक पक्षांची युती झाली असं वर करणी दिसत असलं, तरी भाजपाला सत्तेत वाटा देण्याचं आ. संग्राम जगतापांचं धोरण असून जगताप महापालिकेत सर्वपक्षीय सत्ता पॅटर्न अमलात आणण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येत आहे.
राज्यातील सत्ता समीकरणे काहीही असोत, पण शहरातील भाजपा व राष्ट्रवादीची मैत्री तुटण्याची शक्यता कमीच आहे. भाजपाकडे महापौरपदासाठी उमेदवार असता तर आता सुरू झालेली शिवसेना राष्ट्रवादी युती होण्याची शक्यता कमीच होती. आजच्या घडीला भाजपा काँग्रेस मध्ये आ. जगताप समर्थक नगरसेवकांचा भरणा असल्यामुळे ते किंग मेकरची भूमिका पार पाडत आहेत.
शिवसेना-राष्ट्रवादीचे अनेक वर्षांपासूनचे शत्रुत्व या निवडणुकीच्या निमित्ताने संपुष्टात येत असले, तरी आजही शिवसेनेतील एक गट मागील घटना विसरणं शक्य नाही शिवसेनेच्या एका गटाने आ. जगतापांशी सुत जुळविल्याने व महापौर शिवसेनेचा होत असल्यामुळे हा गट आज वरकरणी शांत वाटत असला तरी आतून स्पष्टपणे नाराजी व्यक्त करत आहे. मागील अडीच वर्षाच्या काळात भाजपाचा महापौर व उपमहापौर असताना शिवसेनेला सतत दुय्यमस्थान मिळत असायचा आरोप शिवसेनेकडून सातत्याने होत होता. स्थायी समिती सभापती पद शिवसेनेला मिळावे यासाठी शिवसेनेने प्रयत्नही केले होते. पण शिवसेनेला यश मिळाले नव्हते आता शिवसेनेला महापौर पद मिळणार असल्याने शिवसेनेच्या नव्या राजकारणाची ही नांदी ठरणार आहे.

नगरचे राजकारण हे नेहमी हटके असतं ते सगेसोयरे यांच्या राजकारणामुळे. नगरचे जगताप, कर्डिले, कोतकर हे वेगवेगळ्या पक्षात असले तरी प्रत्यक्षात मात्र सर्वच एकत्रच असल्याचे अनेक वेळा दिसून येते.कोतकर पिता-पुत्र या निवडणुकीपासून बाजूला असल्यामुळे सध्या सुरू असलेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत आ.संग्राम जगताप सध्या किंग मेकर च्या भूमिकेत आहेत. पूर्वी नगरमधील राजकारणातील किंगमेकरची भूमिका शिवाजीराव कर्डिले पार पाडीत आत्ताही ते या भूमिकेत असतील, पण पडद्याआडून. कर्डीले आज जरी भाजपात असले तरी जावयाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून पडद्याआडून सर्व सेटिंग लावत आहेत. महापालिकेतील सत्तेच्या माध्यमातून जुना मित्र भाजपा नवा मित्र शिवसेना महा विकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, मागील अडीच वर्षाच्या सत्ता सहभागातील बसपा, यांना उर्वरित अडीच वर्षाच्या सत्तेत सहभाग देऊन विकासाची सहमती एक्सप्रेस जोरात धावली तर नगरकरांना यात आनंद होईल यात शंका नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here