फरार युवक गजाआड! पुण्यातील महिलेवर अत्याचार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 11, 2021

फरार युवक गजाआड! पुण्यातील महिलेवर अत्याचार.

 फरार युवक गजाआड! पुण्यातील महिलेवर अत्याचार.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पुण्यातील कोंढवा परिसरातील एका महिलेवर अत्याचार करून नगरमध्ये लपून राहिलेल्या फरार आरोपीस कोहिनूर मंगल कार्यालय जवळील वृद्धेश्वर कॉलनीतून ताब्यात घेतले आहे. या परिसरात या तरूणाचा संशयास्पद वावर दिसून आल्यानंतर नागरिकांनी तोफखाना पोलिसांना याबाबत माहिती दिली पोलिसांनी या युवकाकडे अधिक चौकशी करत असता त्याने पुण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल असल्याची माहिती दिली. आदित्य शंकर तवपुते वय 29 रा. पुणे असे आरोपीचे नाव आहे.
महिलेवर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी त्याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. घटना घडल्यापासून तो फरार होता. तोफखाना पोलिसांनी अत्यंत शिताफीने आरोपीला ताब्यत घेतले असून तोफखाना पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुरज मेंढे, शाकीर सय्यद, अविनाश वाकचौरे ,वसीम पठान, शैलेश गोमसाळे, सचिन जगताप, संपदा तांबे यांनी ही कारवाई केली.

No comments:

Post a Comment