राहुरी तालुक्यातील भौगोलिकदृष्ट्या अलग झालेल्या गावांना जोडण्यासाठी पूल बांधण्यात यावा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 10, 2021

राहुरी तालुक्यातील भौगोलिकदृष्ट्या अलग झालेल्या गावांना जोडण्यासाठी पूल बांधण्यात यावा

 राहुरी तालुक्यातील भौगोलिकदृष्ट्या अलग झालेल्या गावांना जोडण्यासाठी पूल बांधण्यात यावा

नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः मुळा धरणाच्या फुगवट्याच्या पाण्यामुळे राहुरी तालुक्यातील भौगोलिकदृष्ट्या अलग झालेल्या गावांना जोडण्यासाठी पूल बांधण्यात यावा यासाठी जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सकारात्मक चर्चा झाली .
यावेळी माजी खा.प्रसाद तनपुरे ( व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे ) सार्वजनिक बांधकाम विभागाचे तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.राहुरी तालुक्याच्या पश्चिम भागातील मुळा धरणाच्या पैलतिरी असलेल्या जांभळी ,जांभुळबन व वावरथ या तीन गावच्या लोकांना सर्व प्रशासकीय कामासाठी राहुरी या तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते.त्यासाठी त्यांना बोटीचा वापर करावा लागतो.यापूर्वी बोटीचा अपघात झाल्याने काही लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे . आजही लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.हा पूल झाल्यानंतर राहुरी तालुक्यातील या तीन गावांतील रहिवाशांना दळवळण सुलभ होणार आहे.तसेच पारनेर तालुक्यातील लगतच्या गावांनाही फायदा होणार आहे.जलसंपदा मंत्री ना पाटील यांच्यासोबत ची बैठक अत्यंत सकारात्मक झाली.यासाठी जलसंपदा खात्यामार्फत तातडीने सर्वे करण्यात येणार आहे.या भागातील लोकांनी विधानसभा निवडणुकीत जो विश्वास माझ्यावर दाखवला , त्याला तडा जाऊ न देता त्यांचे जीवन सुखकर होण्यासाठी माझे पूर्ण प्रयत्न मी करत आहे असे तनपुरे म्हणाले.

No comments:

Post a Comment