विनाकारण फिरणार्‍यांकडून 35 लाख 11 हजार 400 रुपयांचा दंड वसूल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 10, 2021

विनाकारण फिरणार्‍यांकडून 35 लाख 11 हजार 400 रुपयांचा दंड वसूल

 विनाकारण फिरणार्‍यांकडून 35 लाख 11 हजार 400 रुपयांचा दंड वसूल

बेलवंडी पोलिसांकडून जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई

नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः कोरोना काळात कोव्हीड -19 चा प्रसार वाढु नये म्हणुन शासनाने लॉकडाऊन जाहीर केले असताना. लॉकडाऊनच्या काळात विनाकारण बाहेर फिरणारे , मास्क न वापरणारे , सोशल डीस्टन्स न पाळणारे यांच्यावर बेलवंडी पोलिसांनी कडक कारवाई करत 19 फेब्रुवारी ते  8जुन या 4 महिन्याच्या कालावधीत 35 लाख 11 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत चालला असल्याने विनापरवाना इतर जिल्ह्यातून येणारे वाहन चालक, वाहनांमध्ये ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त व्यक्ती, मास्क न वापरणारे , सोशल डीस्टन्स न पाळणारे यांच्यावर बेलवंडी पोलीसांनी 19 फेब्रुवारी ते 8 जुन या कालावधीत दंडात्मक कारवाई करत सुमारे 35 लाख 11 हजार 400 रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला.
तसेच अहमदनगर पुणे महामार्गावर गव्हाणवाडी येथे अंतरजिल्हा चेकपोस्ट लावून वाहने चेक करून विनापरवाना इतर जिल्ह्यातून येणारे वाहन चालक यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई करण्यात येत आल्याची माहिती पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी दिली. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक मनोज पाटील , अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल , उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, श्रीगोंदा पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रकाश बोराडे, पोलिस कर्मचारी हसन शेख, पो.ना. संतोष गोमसाळे, ज्ञानेश्वर पठारे, म.पो.काँ. शोभा काळे, संपत गुंड, बजरंग गवळी, मारूती कोळपे, संदिप दिवटे, रावसाहेब शिंदे, विकास करखीले, होमगार्ड यांच्यासह पोलिस कर्मचार्‍यांनी केली.

No comments:

Post a Comment