राहुरीत शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 7, 2021

राहुरीत शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न

 राहुरीत शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न

नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः
रविवार 6 जून रोजी छत्रपती चौक राहुरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.
छत्रपती चौक या ठिकाणी मराठा बहूऊद्देशीय संस्था संचालित मराठा एकीकरण,शिवराज्याभिषेक सोहळा कमिटी राहुरी तालुका यांच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र लांबे पाटील यांनी संगितले.
यावेळी शाश्रयुक्त पाठणात जिजाऊंच्या लेकी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पंच धातूच्या मूर्तीस पंचामृताचा अभिषेक घालून विधिवत पूजन करण्यात आले.स्वराज्याचे निशाण भगवा ध्वज उभारून वंदन करण्यात आले.शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्राजक्ता वाघ,शेजल ढेपे,वैष्णवी देहडराय,प्रतिभा घाडगे,विद्या अरगडे, जाणका लबडे,वर्षा लांबे,राजश्री घाडगे आदी उपस्थित होत्या.प्राजक्ता वाघ यांनी सिहं गर्जना म्हंटली.  
यावेळी  अमोल पवार पा. म्हणाले की छत्रपती चौक राहुरी येथे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचे हे पहिलेच वर्ष आहे.कोरोंना रोगाच्या प्रादुर्भावमुळे साध्य पद्धतीने सोहळा साजरा करण्यात आला आहे. पुढच्या वर्षी 6 जून 2022 चा सोहळा निश्चित मोठ्या थाटात साजरा केला जाणार आहे.2022 च्या सोहळ्याचे नियोजन यावर्षीच केले जाईल.
या सोहळ्यास उपाध्यक्ष राजेंद्र लबडे,संदीप गाडे,अशोक तुपे,शरद म्हसे,संदीप गिते,डॉ.महेश गव्हाने,ड.अमोल डौले,मधुकर घाडगे,प्रकाश अरगडे,आबासाहेब शेटे,रणजीत चव्हाण,राहुल अडसूरे,अविनाश क्षीरसागर,विक्रम मोढे,दिनेश झावरे,निखिल भुजाडी,सतिष घुले,योगेश कोहकडे,निखिल कोहकडे,अरुण निमसे,विनोद सरोदे,पंडित निभोरे,ज्ञानेश्वर टेकाळे,प्रशांत टेकाळे,विक्रम गाढे,गजानन गागरे,विनायक बाठे,सागर ताकटे,सचिन मेहेत्रे,संजय पोपळघट,शिवाजी खणसे,रविंद्र तनपुरे,कुलदीप नवले,संभाजी खणसे,संदीप खाडवे,भुजाडी,नितिन पानसरे,विनोद सरोदे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here