शिवराज्याभिषेक दिनी मक्तापूर ग्रामपंचायतीमध्ये भगवा झेंडा उभारून शिवरायांना अभिवादन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 7, 2021

शिवराज्याभिषेक दिनी मक्तापूर ग्रामपंचायतीमध्ये भगवा झेंडा उभारून शिवरायांना अभिवादन

 शिवराज्याभिषेक दिनी मक्तापूर ग्रामपंचायतीमध्ये भगवा झेंडा उभारून शिवरायांना अभिवादन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळयाच्या शिवस्वराज्य दिनी मक्तापूर    ग्रामपंचायतमध्ये भगवा झेंडा   उभारून छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले.छत्रपती शिवराय हे कोण्या एका समाजाचे पाठीराखे नव्हते  तर ते अठरापगड जातींच्या समाजाचे पाठीराखे होते.त्यामुळे जातिभेद आणि धर्मभेद विसरुन सर्व समाजाने एकत्र येऊन छत्रपती शिवरायांचे प्रत्येक सण साजरे केले पाहिजेत असे यावेळी   मक्तापुर शिवसेनेचे शाखाप्रमुख आणि मराठा सुकाणू समितीचे प्रदेश अध्यक्ष  गणेश झगरे यांनी यावेळी बोलताना केले.
युवा नेते उदयन दादा गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या कार्यक्रम प्रसंगी  शिवराज्याभिषेक  दिनाच्या निमित्ताने भगवा झेंडा   उभारण्यात आला.
यावेळी हभप दिलीपमहाराज बर्डे  ,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दत्ता कांगुणे , पोलिस पाटील संदीप लहारे , सरपंच अनिल   लहारे, उपसरपंच राहुल साळवे , भरत काळे,  अजय कोळेकर , अनिल गोरे,  अलकाताई साळवे , जयश्रीताई कोळेकर,  उषाताई कराडे,  गोरक्षनाथ  बर्डे , अनिल साळवे  ,अशोक कांगुणे,  अजित झगरे  ,सुनिल साळवे  ,अशोक साळवे  आणि ग्रामसेवक संजय वाघ यांनी उपस्थित राहून   छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन यावेळी केले.हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय,हर हर महादेव ही शिव गर्जना करण्यात आली.
 राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत गाऊन शिवराज्य दिन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments:

Post a Comment