महापौर, उपमहापौर महाविकास आघाडीचाच! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 28, 2021

महापौर, उपमहापौर महाविकास आघाडीचाच!

महापौर, उपमहापौर महाविकास आघाडीचाच!

महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेकडून महापौर पदासाठी रोहिणी शेंडगे यांचा अर्ज दाखल


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी आज शिवसेनेच्या नगरसेविका रोहिणी शेंडगे यांनी महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दि 30 रोजी ऑनलाइन पद्धतीने निवडणूक होणार आहे. दरम्यान महानगरपालिकेच्या आवारामध्ये जय भवानी जय शिवाजी, महाविकास आघाडीचा विजय असो, अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.

नगर महानगरपालिकेच्या महापौर पदाकरिता शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीच्या वतीने त्यांनी हा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी आज आपले चार उमेदवारी अर्ज महापौर पदाकरता दाखल केलेले आहे. या अर्जावर सूचक म्हणून पुष्पा बोरुडे तर अनुमोदक म्हणून अनिल शिंदे दुसरा अर्जावर सुरेखा कदम सूचक तर गणेश कवडे अनुमोदक म्हणून आहेत तिसर्‍या अर्जावर अशोक बडे हे सूचक असून विजय पठारे हे अनुमोदक आहे. चौथा अर्जावर सुवर्णा गेनाप्पा या सूचक असून विद्या खैरे या अनुमोदक आहेत. महापौर व उपमहापौर पदाची निवड होणार असुन पीठासीन अधिकारी म्हणून डॉक्टर राजेंद्र भोसले हे आहेत. ऑनलाइन पद्धतीने ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकी करता शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
यावेळी बोलताना महापौरपदाच्या उमेदवार रोहिणी शेंडगे यांनी सांगितले की, गेल्या वीस वर्षापासून आम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलेलो आहोत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला महापौरपदासाठी संधी दिली त्याकरता मी त्यांची आभारी आहे. तसेच या महानगरपालिकेमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी ही निवडणूक एकत्रितपणे लढणार आहोत. आज मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. निवडणुकीनंतर आम्ही सर्वजण नगर शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आज उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्व महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचे सुद्धा आपण आभार मानते, असे ही त्या म्हणाल्या.
यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, युवा सेनेचे जिल्हा अधिकारी विक्रम राठोड, शहर प्रमुख दिलीप सातपुते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गणेश भोसले, विनीत पाऊलबुद्धे, कुमार वाकळे, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, विरोधी पक्ष नेता संपत बारस्कर, माजी महापौर सुरेखा कदम, पुष्पा बोरुडे, रिता भाकरे, सुवर्णा जाधव, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक अनिल शिंदे, गणेश कवडे, सुभाष लोंढे, मदन आढाव, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, अशोक बडे, योगीराज गाडे, सचिन शिंदे, शाम नळकांडे, अनिल बोरुडे, बाळासाहेब बोराटे, विजय पठारे, अमोल येवले, प्रशांत गायकवाड, सुरेश तिवारी, दत्ता जाधव, अशोक दहिफळे, संजय शेंडगे, संतोष गेनाप्पा, विद्या खैरे, महिला आघाडीच्या आशा निंबाळकर, अरुणा गोयल, उषा ओझा आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

राज्यामध्ये सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आधिपत्याखाली सध्या राज्याचा कारभार सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संकल्पनेतून ही महाविकास आघाडी सध्या राज्यामध्ये कार्यरत आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हेसुद्धा या महाविकास आघाडीचे नेते आहेत. या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे येऊन सध्या सरकारमध्ये काम पाहत आहेत. त्याच पद्धतीने आता राज्यभर  स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून सुद्धा महाविकास आघाडी व्हावी, या उद्देशाने आम्ही आता तयारी केली होती. त्याचाच एक भाग म्हणून आज महानगरपालिकेच्या नगरच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने एकत्रितपणे येऊन आज महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आमच्या बरोगर काँग्रेस व इतर पक्ष सुद्धा आहेत.
- भाऊ कोरगावकर, शिवसेना संपर्कप्रमुख

महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आता महाविकास आघाडीने एकत्रितपणे येऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून झालेला आहे. त्याची अंमलबजावणी आम्ही केली आहे. आज शिवसेनेचा महापौर पदाच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला असून, उपमहापौर पदासाठी आम्ही उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत, शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आता आम्ही कटिबद्ध आहोत.
- संग्राम जगताप, आमदार

No comments:

Post a Comment