राळेगण- गव्हाणवाडी रस्ता दुरुस्ती साठी आंदोलन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 28, 2021

राळेगण- गव्हाणवाडी रस्ता दुरुस्ती साठी आंदोलन.

 राळेगण- गव्हाणवाडी रस्ता दुरुस्ती साठी आंदोलन.

शिवबा संघटना/परीवर्तन फाउंडेशन/ सर्वसामान्य जनतेचा निर्धार.



नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील अतिशय महत्वाचा रस्ता अळकुटी - निघोज - गव्हाणवाडी फाटा हा आहे. राळेगण थेरपाळ पर्यंत रस्त्यावर नुकतेच कारपेट टाकण्यात आले. मात्र राळेगण ते गव्हाणवाडी फाटा रस्ता अतिशय खराब झाला आहे. यावर अनेक अपघात होत आहे. दुरुस्ती बाबत वारंवार मागणी होत असतानाहि दुर्लक्ष होत आहे. त्याचप्रमाणे नुकतेच करण्यात अळकुटी - राळेगण थेरपाळ डाबरी कारपेट करण्यात आले. मात्र तेहि पूर्णतः उखडले आहे. त्याचीहि चौकशी व्हायला हवी. याबाबत आज निवेदन देण्यात आले. व त्वरित कार्यवाही करण्यात यावी अन्यथा ८ दिवसानंतर कुठल्याही क्षणी आंदोलनाची भूमिका घेण्यात येणार असल्याचे अध्यक्ष अनिल शेटे यानी सांगितले.

निवेदन मा. नितीन गडकरी रस्ते बांधकाम मंत्री व मा. उपविभाग अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग नारायणगाव,मा.तहसीलदार पारनेर,मा.पोलिस निरीक्षण पारनेर यांना देण्यात आले आहे. 

निवेदनावर शिवबा संघटना अध्यक्ष अनिल शेटे,राजु भाऊ लाळगे,शंकर पाटील वरखडे, निघोज शहर प्रमुख अंकुश वरखडे, शेतकरी तालुकाप्रमुख जयराम सरडे,अल्पसंख्याक तालुकाप्रमुख नवशाद पठाण,विदयार्थी तालुकाप्रमुख मच्छिंद्र लाळगे, यश रहाणे,नागेश नरसाळे,अनिल गागरे,शांताराम पाडळे,दादाभाऊ रसाळ,गणेश चौधरी,शुभम धायरे,ग्रामपंचायत सदस्य एकनाथ मेसे,सोनु मदगे,दत्ता टोणगे, पांडुरंग कारखिले,शुभम पाडळे, सोशल मिडिया प्रमुख निलेश वरखडे,रोहन वरखडे,विकास मोरे, रोहित मोरे, आदि पदाधिकारी ची सह्या आहेत.

No comments:

Post a Comment