सिद्धीबागेचे लवकरच नूतनीकरण! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 11, 2021

सिद्धीबागेचे लवकरच नूतनीकरण!

 सिद्धीबागेचे लवकरच नूतनीकरण!

मत्सालय नूतनीकरणाचा आ. संग्राम जगतापांच्या हस्ते शुभारंभ.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
सिद्धीबागेने नगर शहराला एक वैभव दिले. सर्व नगरकर लहान असताना या बागेमध्ये खेळले,बागडले आम्ही सुद्धा या बागेत लहान असताना खेळलो. लवकरच सिद्धीबागेचे खाजगीकरणातून नूतनीकरण करण्यात येणार आहे.आता आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. कै.कृष्णाभाऊ जाधव यांनी समाजाच्या प्रश्नाबरोबरच सिद्धीबागेच्या विकासासाठी नेहमीच हातभार लावला आहे.भाऊंचा वारसा अ‍ॅड.धनंजय जाधव सक्षमपणे पार पाडत आहे. सिद्धीबागेसारखे शहरामध्ये विविध ठिकाणी छोटे उद्यान निर्मितीचे काम सुरू आहे.असल्याचं प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केला आहे.
धनंजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त साई द्वारका सेवा ट्रस्टच्या माध्यमातून सिद्धीबागेतील मत्सालयाचे नूतनीकरण करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
उद्योजक निखिल लुनीया,राजेश गुगळे,प्रताप काळे यांच्या सौजन्यतुन व संकल्पनेतून साकारण्यात आलं आहे. मनपा व श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने मत्सालय नूतनीकरणाचा शुभारंभ आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.  याप्रसंगी धनंजय जाधव म्हणाले की,श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट वर्षभर सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रम राबवत असतात नगर शहराला सिद्धीबागेचा मोठा वारसा लाभला आहे.मत्सालय नूतनीकरणाच्या मुहूर्त साधला आहे.लवकरच सिद्धीबागेचे नुतनीकरण करण्यात येणार आहे.या कामासाठी आ.संग्राम जगताप यांचे सहकार्य मिळणार आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवाराने मत्सालय नूतनीकरणाचा कार्यक्रम केला याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, भविष्यकाळातही ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवणार असे ते म्हणाले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष ड. धनंजय उपमहापौर मालनताई ढोणे, प्रा.माणिकराव विधाते,डॉ.गोपाळ बहुरूपी, बाळासाहेब जगताप, निखिल लुनीय,प्रताप काळे,राजेश गुगळे, साहेबांन जहागीरदार,डॉ.विक्रम पानसंबळ,डॉ.आदिती पानसंबळ,उद्यान प्रमुख मेहर लहारे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment