जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 5, 2021

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण!

 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण!नगरी दवंडी

नेवासा - जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून इच्छा फाऊंडेशनने शंभर वृक्षांचे रोपण नेवासा तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी केले.इच्छा  फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ .मनीषा देवळालीकर यांनी या वेळी वृक्षारोपणाची गरज स्पष्ट करताना आवाहन केले की, "प्रत्येकाने किमान एक झाड तरी लावावे.जेणेकरून आपल्याला आवश्यक असणार्या ऑक्सिजनची गरज भागवता येईल आणि या कोरोणाच्या काळात ऑक्सिजनच्या गरजे अभावी अनेक लोकांचे मृत्यू झाले    आहेत .त्यामुळे ती पातळी भरुन काढण्यासाठी वृक्षसंवर्धन गरजेचे आहे ."या वेळी संस्थेचे सचिव विशाल देवळालीकर ,तृप्ती शेवंते, रविशंकर देवळालीकर ,अनुराधा देवळालीकर ,ज्ञानेश सिन्नरकर ,शोभा देवळालीकर,मयूरी पंडित,उषाताई पंडित,पुष्पलता मोरे आदींनीही वृक्षारोपणामध्ये सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment