पेट्रोल डिझेल गॅस दरवाढी संदर्भात जामखेड काँग्रेस आक्रमक.... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 5, 2021

पेट्रोल डिझेल गॅस दरवाढी संदर्भात जामखेड काँग्रेस आक्रमक....

 पेट्रोल डिझेल गॅस दरवाढी संदर्भात जामखेड काँग्रेस आक्रमक.... नगरी दवंडी

जामखेड - आज दि.५ जून २०२१ शनिवार रोजी सकाळी ठीक ११ वा. पेट्रोल व डिझेल दरवाढ विरोधात जिल्हा युवक काँग्रेस,तालुका व शहर युवक काँग्रेस तसेच जामखेड तालुका व शहर कॉंग्रेस कमिटी च्या वतीने जामखेड शहरात नगर रोड वरील पेट्रोल पंपावर गांधीगिरी आंदोलन करण्यात आले,यावेळी पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना पेट्रोल १०० रुपये च्या पुढे गेले असून गुलाबपुष्प तसेच साखर वाटून पंपावर स्वागत तसेच अभिनंदन करण्यात आले,ग्राहकांनी यावेळी भावाढीवर नाराजी व्यक्त करत सर्वसामान्य नागरिकांनी आयुष्य जगायचे तरी कसे आशा भावना केल्या,यावेळी अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष राहुल उगले यांनी म्हटले की गेल्या काळात वीज दरवाढ झाली म्हणून विजबिलाची होळी करणाऱ्या सत्ताधार्यांनी आता पेट्रोल डिझेल भाववाढीवर पेट्रोल पंपाची व गॅस सिलेंडरची होळी केल्यास अधिक समाधान वाटेल.काँग्रेस तालुकाध्यक्ष शहाजी राजेभोसले यांनी मोदी सरकारने अश्वसित केल्या प्रमाणे ग्राहकांना 15 लाख खात्यात आले का विचारना केली व दरवाढीसाठी आपणच कारणीभूत आहोत त्यामुळे तोंड गोड करा व पुन्हा झालेली चूक करू नका असे सांगितले,शहराध्यक्ष देवीदास भादलकर यांनी ग्राहकांना गुलाबपुष्प देत दरवाढ अजून झाल्यास आश्चर्य वाटायला नको पक्षीय मार्केटिंग वर न जाता केलेल्या कामावर मतदान करावे असे त्यांनी सांगितले,यावेळी जिल्हा सचिव सुनिल शिंदे,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष फिरोज भाई पठाण,युवक काँग्रेस शहराध्यक्ष विक्रांत अब्दुले, शहर उपाध्यक्ष महादेव कोल्हे, शहर कार्याध्यक्ष शुभम बनकर, अनिकेत जाधव तसेच अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक उपास्थित होते.

No comments:

Post a Comment