शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त आर्यवीर फौंडेशनच्या एक झाड माझेसुद्दा उपक्रमाला सुरुवात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, June 5, 2021

शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त आर्यवीर फौंडेशनच्या एक झाड माझेसुद्दा उपक्रमाला सुरुवात

 शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त आर्यवीर फौंडेशनच्या एक झाड माझेसुद्दा उपक्रमाला सुरुवात नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

सध्याच्या काळात ऑक्सिजनचे महत्व अधोरेखित झाले आहे व त्याची जाणीव सर्वांनाच झाली आहे.शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त येत्या ६ जून रोजी आर्यवीर फौंडेशन तर्फे महाराष्ट्रभर एक झाड माझे सुद्दा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उदघाटक प्रा.डॉ. रमेश शंकर कळमकर (शिवव्याखाते -लेखक ) हे असतील तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. सुनिल आनंदा शिंदे, ग्रा. पं. सदस्य पिंपळगाव तुर्क, पारनेर हे असतील. प्रत्येक व्यक्तीने किमान एक झाड लावून ते जगविल्यास पर्यावरणाच्या दृष्टीने नक्कीच हिताचे ठरणार आहे. एक झाड माझेसुद्दा हा उपक्रम दरवर्षी ६ जून ते ६ ऑगस्ट पर्यंत राबविण्याचा मानस आहे . आपण सर्वांनी एक झाड लावून आर्यवीर फौंडेशनच्या उपक्रमात सहभागी व्हावे व सर्वांना यात सामील करून घ्यावे असे आवाहन आर्यवीर फौंडेशनचे अध्यक्ष अरुण वाळुंज यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या आयोजनात उपाध्यक्ष गोरख चव्हाण , खजिनदार एकनाथ वाळुंज यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. आर्यवीर फौंडेशनच्या या उपक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा देत या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here