सामाजिक संस्थांना कर्तव्य भावनेतून मदत करावी : धिरज कोठारी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 11, 2021

सामाजिक संस्थांना कर्तव्य भावनेतून मदत करावी : धिरज कोठारी

 सामाजिक संस्थांना कर्तव्य भावनेतून मदत करावी : धिरज कोठारी

अरिहंत युवक मंडळातर्फे मातोश्री वृद्धाश्रमास किराणा भेट


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः 
नगर: करोना महामारी व लॉकडाऊन मुळे समाजातील अनेक घटक अडचणीत आले आहेत. समाजाच्या मदतीवर चालणारे वृद्धाश्रमांसमोरही अडचणी आहेत. अशा संस्थांना कर्तव्य भावनेतून  जास्तीत जास्त मदत केली पाहिजे, असे प्रतिपादन श्री अरिहंत युवक मंडळाचे धिरज कोठारी यांनी केले.
नगरच्या महावीर नगर येथील श्री अरिहंत युवक मंडळाच्या युवकांनी विळद येथील मातोश्री संस्थेस किराणा भेट दिला. यावेळी धिरज कोठारी,  स्वप्नील गांधी, मधुर गांधी, गौतम मुथा, निर्मल लोढा, सचिन बडेरा, राहुल चंगेडिया, मनोज भटेवरा, गणेश गांधी, सचिन मवानी आदी उपस्थित होते.
अरिहंत युवक मंडळ करोना काळात विविध माध्यमातून समाजातील गरजूंना मदतीचा हात देत आहे. सध्या विविध सामाजिक संस्थांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन मंडळाने मातोश्री संस्थेस किराणा देऊन येथिल ज्येष्ठांना मायेचा आधार देण्याचे काम केले आहे

No comments:

Post a Comment