बालसंगोपन योजनेतील लाभार्थ्यांचे मानधन अडकले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 11, 2021

बालसंगोपन योजनेतील लाभार्थ्यांचे मानधन अडकले

 बालसंगोपन योजनेतील लाभार्थ्यांचे मानधन अडकले

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः बालसंगोपन योजनेसाठी अर्ज केलेल्या नगर तालुक्यातील लाभार्थ्यांना अदयापपर्यंत बालसंगोपन योजनेचा लाभ न मिळालेला नाही . या योजनेचा लाभ लवकर मिळून दयावा याबाबत चे निवेदन पंचायत समिती उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले .
नगर तालुक्यातील एक पालक, अनाथ मुलांनी बालसंगोपन योजनेचा लाभ मिळणेसाठी जानेवारी 2020 पासून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचेकडे अर्ज सादर केलेले आहेत. परंतु, अदयापपर्यंत एकाही लाभार्थ्यास बालसंगोपन योजनेचा लाभ या कार्यालयाकडुन देण्यात आलेला नाही. या कार्यालयाच्या अनास्थेमुळे आज नगर तालुक्यातील अंदाजे 150-200 बालके लाभापासुन वंचित आहेत. सोबतच संबंधित कुटुंबावर मागील वर्षी तसेच यावर्षी सुद्धा कोरोनामुळे आपत्ती ओढावली आहे. हलाखीची परिस्थिती असणा-या अनेक जणांनी हया योजनेसाठी अर्ज केले होते. जवळपास सव्वा वर्ष त्यांचे या  लाभापासुन नुकसान झालेले आहे. प्रशासनाच्या दिरंगाई मुळे हे घटक वंचित असुन लाभार्थ्यांना तात्काळ संगोपन योजनेचा लाभ सुरु करावा. अन्यथा दि.17 जुन रोजी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या  कार्यालयात उपोषण करण्यात येईल असा इशारा डॉ. दिलीप पवार यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment