डॉ.विखे पाटील अभियांत्रिकीत एमएचटी-सीईटी 2021 करिता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 11, 2021

डॉ.विखे पाटील अभियांत्रिकीत एमएचटी-सीईटी 2021 करिता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा

 डॉ.विखे पाटील अभियांत्रिकीत एमएचटी-सीईटी 2021 करिता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी राज्य सामाईक प्रवेश परिक्षा मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी / तंत्रज्ञान, औषधनिर्माण शास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारी एमएचटी-सीईटी 2021 प्रवेश परिक्षा महाराष्ट्रातील विविध केंद्रावर घेण्यात येणार आहे.राज्य सामायिक प्रवेश परिक्षा कक्षाने दिलेल्या माहितीनुसार नियमित शुल्कासह अर्जाची ऑनलाईन नोंदणी 8 जून ते 7 जुलै 2021 पर्यंत तर विलंब शुल्कासह 8 ते 15 जुलै 2021 असा कालावधी दिला आहे.
विद्यार्थ्यांकडून या प्रवेश परिक्षेेचे अर्ज भरण्यात बर्याचवेळा चुका होतात, धावपळ होते. या दृष्टीने डॉ.विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात या परिक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध केली आहे. तरी त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाने केले  आहे. अधिक माहितीसाठी प्रवेश प्रक्रिया अधिकारी सौ.मगर (मो.9689041883), डॉ.हाळनोर (मो.9860756322) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
एमएचटी-सीईटी 2021 परिक्षा प्रक्रिया सुरळित पार पाडण्यासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी खा.डॉ. सुजय विखे, सेक्रेटरी जनरल डॉ.बी.सदानंदा, डायरेक्टर टेक्निकल डॉ.पी.एम.गायकवाड, उपसंचालक सुनिल कल्हापुरे, प्राचार्य डॉ.उदय नाईक प्रयत्नशील आहेत.

No comments:

Post a Comment