यांनी सौताडा घाटात केले वृक्षारोपण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 7, 2021

यांनी सौताडा घाटात केले वृक्षारोपण

 सौताडा घाटात केले वृक्षारोपण



नगरी दवंडी

 जामखेड - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेड वनविभाग जामखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने आज सौताडा घाटामध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी कोठारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय कोठारी वन परिमंडळ अधिकारी अनिल खराडे , गौरव अरोरा, अरुण लटके, वनरक्षक किसन पवार ,वनरक्षक प्रवीण उबाळे खर्डा ,श्यामराव डोंगरे कर्मचारी जामखेड आदी उपस्थित होते यावेळी बोलताना वन परिमंडळ अधिकारी अनिल खराडे म्हणाले मी गेली दोन वर्षापासून पाहत आहे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे नेहमीच आम्हाला मदत करत असतात वृक्षारोपण साठी तर ते सर्वात पुढे असतात तसेच  काही वेळेस जखमी अवस्थेत हरीण, तरस, मोर, घुबड ,अशा प्राण्यांना ते आणून आमच्या ताब्यात देतात त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात.

जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन आणि वन विभाग जामखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण५ जुलै २०२१ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि वनविभाग जामखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने सालाबाद प्रमाणे वृक्षारोपण करतात आणि त्याचे संगोपनाची जबाबदारी कोठारी करत असतात आत्तापर्यंत त्यांनी हजारो झाडे लावलेली आहेत आणि त्यातील बरेच झाडे जगवली आहेत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून त्यांनी सौताडा  आणि मोहा घाट येथे झाडे लावून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली आहे 

यावेळी  अली सय्यद म्हणाले गेली पंचवीस वर्षापासून मी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचे कार्य पाहत आहे आम्हाला अभिमान वाटतो कोणत्याही समाजाचा माणूस असला की त्याला ती मदत करतात अपघातातील हजारो लोकांचे प्राण संजय कोठारी यांनी वाचवले आहे ते काही जात पात पाहत नाही स्वतःच्या रुग्णवाहिकेत अपघातातील जखमीला आणून त्याचे प्राण वाचवतात वृक्षारोपण ची  वीस वर्षापासून ते लक्ष देऊन वृक्षारोपण करतात त्यांनी आत्तापर्यंत हजारो झाडे लावली आहेत आणि त्याच्या संगोपनाची सुद्धा जबाबदारी घेत आहेत त्याबद्दल त्यांचे शब्दात वर्णन करू शकत नाही

 येत्या ३१ जुलै पर्यंत १०००(एक हजार) झाडे लावण्याचा संकल्प ही त्यांनी केला आहे वृक्षारोपण वेळी वन परिमंडळ अधिकारी अनिल खराडे , पवार आणि वनमजूर ताहेर अली सय्यद हे हजर राहणार आहेतकोठारी यांना सामाजिक कार्यात नेहमी मदत करनारे प्रफुल्ल सोळंकी ,गणेश भळगट, अमोल तातेड,अनिल फिरोदिया, सुमित चानोदिया, संजय गांधी, गौरव अरोरा आदी उपस्थित होते.गणेश देवकाते ,मनोज कुलथे ,निलेश तवटे सागर नेटके, अनुराग आनंद गुगळे आदि मदत करत असतात

No comments:

Post a Comment