आडते बाजार, डाळ मंडई सुरू करा ; काँग्रेसचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना साकडे काँग्रेस शिष्टमंडळाची जिल्हाधिकार्‍यांना समवेत चर्चा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, June 1, 2021

आडते बाजार, डाळ मंडई सुरू करा ; काँग्रेसचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना साकडे काँग्रेस शिष्टमंडळाची जिल्हाधिकार्‍यांना समवेत चर्चा

 आडते बाजार, डाळ मंडई सुरू करा ; काँग्रेसचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना साकडे 

काँग्रेस शिष्टमंडळाची जिल्हाधिकार्‍यांना समवेत चर्चा नगरी दवंडी

अहमदनगर : अत्यावश्यक सुविधा वर्गात मोडणारी दुकाने त्याचबरोबर भाजीपाला विक्रेते यांना सूट देण्यात आली आहे. मात्र या सगळ्यांचे ठोक विक्रेते असणारे व्यापारी हे आडते बाजार, डाळ मंडई या ठिकाणी आहेत. जोपर्यंत व्यापाऱ्यांची दुकाने उडत नाही तोपर्यंत किराणा दुकान साठी आवश्यक असणाऱ्या मालाचा पुरवठा सुरळीत होऊ शकत नाही. त्यासाठी आडते बाजार, डाळ मंडई तातडीने सुरू करण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी यासाठी काँग्रेसने शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना साकडे घातले आहे. 

तसेच काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची समक्ष भेट घेऊन व्यापार्‍यांच्या प्रश्नावर चर्चा केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संदीप निचित, ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील आदी उपस्थित होते. 

महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करुन माहिती घेतली आहे.प्रशासनाला या बाबतीमध्ये व्यापाऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने सकारात्मक विचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी ना. थोरात यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत नगर शहरातील व्यापारी बांधवांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचल्या होत्या. 

जवळपास मागील सलग दीड महिन्यांपासून संपूर्ण लॉकडाऊन सुरू आहे. तीन वेळा लॉकडाऊन प्रशासनाने केला आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा गटात मोडणाऱ्या व्यापारी यांचे देखील मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अत्यावश्यक सेवा सुविधा सुरू करण्याबरोबरच इतर व्यापाराला देखील सकाळी सात ते दुपारी दोन या कालावधीमध्ये दुकाने उघडण्याची परवानगी प्रशासनाने द्यावी अशी मागणी काँग्रेस शिष्टमंडळाच्या वतीने कालच शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती. परंतु पहिल्या टप्प्यात डाळ मंडई, आडते बाजार सुरू करण्यात यावी यासाठी काँग्रेसच्या वतीने प्रशासनाकडे आग्रह धरण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here