दुचाकी चोरणारे गजाआड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 19, 2021

दुचाकी चोरणारे गजाआड

 दुचाकी चोरणारे गजाआड

स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः दुचाकी वाहने चोरणार्‍या आरोपीला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून दत्तात्रय कासार (रा. वडगाव गुप्ता) याला अटक केली आहे. गुप्त खबर्‍याकडून मिळालेल्या माहितीवरून  अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.  
पिंपळगाव माळवी येथील सुरेश झिणे हे दिनांक 23 मे 2021 रोजीचे रात्री त्यांची हिरो एचएफ डिलक्स मोटार सायकल नंबर एमएच-16 सीएच-8236 हि वरुन जेऊर येथुन कामावरुन परत घरी येत असतांना वडगाव गुप्ता ते पिंपळगाव माळवी जाणारे रोडवर त्यांचे मोटार सायकलचे पेट्रोल संपल्याने संजय ठोंबरे यांचे किरणा दुकाणा जवळ मोटार सायकल उभी करुन पेट्रोल आणण्यासाठी गेले असतांना कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांची 20 हजार रुपये किमतीची मोटार सायकल चोरुन नेली होती या बाबत त्यांनी एमआयडीसी पो. स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोनि  अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे त्यांचे पथकातील अधिकारी व अमंलदार यांचे मदतीने गुन्हयाचा तपास करीत असतांना पोनि/ अनिल कटके यांना गुप्त खबर्‍याकडून माहिती मिळाली कि, हा गुन्हा दत्तात्रय कासार रा. वडगाव गुप्ता याने केला आहे. पथकातील पोसई गणेश इंगळे, मन्सुर सय्यद, मनोज गोसावी, सुरेश माळी, विशाल दळवी, दिपक शिंदे, रोहित येमुल,  शिवाजी ढाकणे, सागर सासाणे, चापोना/ चंद्रकांत कुसळकर यांनी मिळालेल्या माहिती नुसार आरोपीचा वडगाव गुप्ता परीसरात शोध घेवुन आरोपी दत्तात्रय गणपत कासार वय 40 वर्ष, रा. वडगाव गुप्ता, उघडमळा, ता.जि. अ.नगर यास ताब्यात घेतले त्याचेकडे या गुन्हया बाबत कसुन चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याची कबुली देवुन गुन्हयातील चोरलेली 20,000 हजार रुपये किमतीची हिरो एचएफ डिलक्स मोटार सायकल समक्ष हजर केल्याने ती जप्त करण्यात आली आहे.
आरोपीस अधिक विश्वासात घेवुन आणखी कोठे कोठे मोटार सायकल चो-या केल्या आहेत याबाब विचारपुस केली असता त्याने बेलापुर ता. श्रीरामपुर जि.अ.नगर येथुन एक मोटार सायकल चोरी केली असल्याचे सांगुन 25 हजार रुपये  किमतीची होन्डा शाईन मोटार सायकल काढुन दिल्याने ती जप्त करण्यात आली आहे. सदर मोटार सायकल चोरी बाबत श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन येथे गु.न.नंबर 2014 / 2020 भा.द. वि. कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
ही कारवाई मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अहमदनगर, सौरभ कुमार अग्रवाल , अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर,  अजित पाटील , उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग, अ.नगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment