आरोग्य कर्मचारी, आशा सेविकांचे प्रश्न शासनस्तरावर सोडवू ः संभाजी कदम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 19, 2021

आरोग्य कर्मचारी, आशा सेविकांचे प्रश्न शासनस्तरावर सोडवू ः संभाजी कदम

 आरोग्य कर्मचारी, आशा सेविकांचे प्रश्न शासनस्तरावर सोडवू ः संभाजी कदम

शिवसेनेच्या वतीने स्थापनदिनानिमित्त आरोग्य कर्मचार्यांना रेनकोट वाटप..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शिवसेना हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. शिवसेनेने सामाजिक क्षेत्रात काम करताना कायम सर्वसामान्यांना आधार दिला. महापालिकेच्या वतीने कोरोना महामारीच्या काळात आशा सेविका व मानधनावरील आरोग्य कर्मचार्‍यांनी केलेले काम महत्त्वपूर्ण आहे. शहरातील कोरोना परिस्थिती नियंत्रनात आणण्यामध्ये त्यांचा सर्वाधिक वाटा आहे. या आरोग्य कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाईल. आशा सेविका व मानधनावरील आरोग्य कर्मचार्‍यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याची अनेक महिन्यांपासूनची मागणी आहे. यासंदर्भात शासन स्तरावर नगर विकास मंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सकारात्मक प्रयत्न करू, असे प्रतिपादन नगर शहर शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केले.
शिवसेनेच्या स्थापना दिनानिमित्त नगर शहर शिवसेनेच्या वतीने महापालिकेतील आशा सेविका व आरोग्य कर्मचार्‍यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी महापौर सुरेखाताई कदम, शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, युवा सेनेचे जिल्हा अधिकारी विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, अनिल शिंदे, बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, संजय शेंडगे, अनिल बोरुडे, गणेश कवडे, सचिन शिंदे, श्याम नळकांडे, संतोष गेनप्पा, प्रशांत गायकवाड, दत्ता जाधव, गिरीश जाधव, मदन आढाव, योगीराज गाडे, अमोल येवले, काका शेळके, संग्राम कोतकर, पारूनाथ ढोकळे, अंबादास शिंदे, सुमित धेंड, पप्पू भाले, स्वप्नील ठोसर, गौरव ढोणे, संजय आढाव, आकाश कातोरे, मुन्ना भिंगारदिवे, अशोक दहिफळे आदी उपस्थित होते.
माजी महापौर सुरेखा कदम म्हणाल्या की, महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी प्रयत्न केले. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी महापौर असताना आपण पाच कोटी रुपयांची तरतूद केली होती. आज राज्यात शिवसेनेची सत्ता असून नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या इमारतीसाठी आठ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. रुग्णालयांमधील व आरोग्य विभागातील इतर सेवा देता याव्यात, यासाठी मनुष्यबळाची गरज आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ज्या आरोग्य सेविका, आशा वर्कर यांनी काम केले, त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व त्यांना मनपाच्या सेवेत सामावून घेण्यासाठी शिवसेना पाठपुरावा करेल व हा प्रश्न मार्गी लावेल, असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमास शिवसेना पदाधिकारी, युवा सेना पदाधिकारी आदी उपस्थित होते

No comments:

Post a Comment