"पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा २१ तारखेला काढणार हंडा मोर्चा". - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 19, 2021

"पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा २१ तारखेला काढणार हंडा मोर्चा".

 "पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा २१ तारखेला काढणार हंडा मोर्चा".

मक्तापूर ग्रामपंचायतला मराठा सुकाणू समितीचे प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे यांचा इशारा.नगरी दवंडी

वार्ताहर ;नेवासा  

मराठा सुकाणू समितीचे प्रदेश अध्यक्ष आणि मक्तापूर शिवसेना शाखाप्रमुख गणेश झगरे यांनी आज मक्तापुर ग्रामपंचायतमध्ये निवेदन देऊन वीज आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.सततच नागरिकांना होणार्या त्रासाची आणि  अडचणींची ग्रामपंचायतने योग्यवेळी दखल घ्यावी अन्यथा सोमवार दिनांक २१जून रोजी समस्त ग्रामस्थ आणि महिलांना  घेऊन मक्तापूर ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा दिला .या वेळी विशाल बर्फे ,भाऊसाहेब साळवे उपस्थित होते.निवेदन ग्रामपंचायत कर्मचारी सुनील साळवे यांनी स्वीकारले.

ग्रामस्थांना होणार्या अडचणीबाबत मी कायमच सक्रिय असतो.परंतु ग्रामसेवकांना तक्रार केल्यानंतर त्यांनी माझा मोबाईल नंबरच आता ब्लॅक लिस्टमध्येच टाकला आहे.त्यामुळे आता आम्ही अडचणी सांगायच्या   कुणाला❓"

 श्री.गणेश झगरे

 मराठा सुकाणू समिती प्रदेशाध्यक्ष. 

शिवसेना शाखाप्रमुख ,मक्तापूर.

No comments:

Post a Comment