शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्राचे धडे अंगी कारावे : आ. संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 28, 2021

शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्राचे धडे अंगी कारावे : आ. संग्राम जगताप

 शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्राचे धडे अंगी कारावे : आ. संग्राम जगताप

समृद्धी वामन हिला यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्काराने सन्मानित


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शिक्षणा बरोबर आजची युवा पिढी क्रीडा क्षेत्रातही आपले करिअर करत  आहे यासाठी प्रत्येकाने जिद्द चिकाटी व  मेहनतीचा  जोरावर क्रीडा क्षेत्रामध्ये आपले नाव उज्वल करावे यासाठी युवक - युवतीने क्रीडा क्षेत्राकडे वळावे  कुमारी समृद्धी वामन या युवतीने बालवयापासून क्रीडा क्षेत्राचे धडे गिरवले यामुळे आज तीने राष्ट्रीय खेळाडू पर्यंत मजल मारली आजच्या खेळाडूंनी  समृद्धी वामन हिचा  आदर्श डोळ्यासमोर ठेवून क्रीडा क्षेत्रामध्ये आपले करियर करावे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार समृद्धी वामन हिने मिळून नगर शहराच्या नाव लवकिकात भर टाकली असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले
अहमदनगर जिल्ह्याची राष्ट्रीय खेळाडु समृद्धी चंद्रकांत वामन हिला यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्काराने सन्मानीत केल्याबद्दल सत्कार करताना आमदार संग्राम जगताप राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिकराव विधाते राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे सुरेश बनसोडे सुरेश शेटे अ‍ॅड सुनील चावरे आदी उपस्थित होते
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण मुंबई यांचे तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार (युवती) 2019 हा अहमदनगर जिल्ह्याची राष्ट्रीय खेळाडु कु.समृद्धी चंद्रकांत वामन यास धनुर्विद्या या क्रिडा प्रकारातील उल्लेखनीय कामगीरी बद्दल पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. समृद्धी ही त्रिमुर्ती पब्लिक स्कुल नेवासाफाटा येथुन इयत्ता 6 वीत असल्या पासुन धनुर्विद्या या क्रीडा प्रकारात सराव करत आहे आज समृद्धी ज्ञानेश्वर महाविद्यालयामध्ये द्वितीय वर्ष विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. तिच्या या यशामध्ये तिच्या आई चा मोठा वाटा आहे. समृद्धी ही गेल्या 8 ते 9 वर्षापासुन अभिजीत दळवी व डॉ.शुभांगी रोकडे दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली धनुर्विद्या चा सराव करत आहे. तिच्या या यशाबद्दल धनुर्धारी संघटने उपाध्यक्ष सुरेश शेटे, अ‍ॅड.सुनिल चावरे रामदास शिंदे, अ‍ॅड. चंद्रकांत शेकडे स्वराज्य क्रीडा व सामाजीक प्रतिष्ठाण च्या अध्यक्षा सौ. सरोज दळवी, उपाध्यक्षा सौ.पल्लवी चव्हाण, मीरा बेरड, रुपेश चव्हाण, सुनिल बेरड नगर तालुका धनुर्विद्या संघटनेचे सचीव धनंजय कारंडे, कीशोर बेरड, शुभम शेटे, शुभम बेरड, श्रीरामपुर तालुका सचीव सचिन घावटे, नेवासा तालुका सचीव पांडुरंग उदे, सुधिर बोरकर तिच्या या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या. समृद्धी वामन हिला यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कारने  2019- 20 साली सन्मानित केले आहे मुंबई येथे जानेवारी 2021 ला कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते परंतु या महाभयंकर कोरोनाचा संकट हा कार्यक्रम करणे उचित नसल्यामुळे हा पुरस्कार समृद्धी वामन हिला प्रदान करण्यात आला रोख रक्कम सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here