सन्मिता शिंदेचा आवाज महाराष्ट्राबाहेरही वेगळी ओळख निर्माण करेल - अवधूत गुप्ते - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 16, 2021

सन्मिता शिंदेचा आवाज महाराष्ट्राबाहेरही वेगळी ओळख निर्माण करेल - अवधूत गुप्ते

 सन्मिता शिंदेचा आवाज महाराष्ट्राबाहेरही वेगळी ओळख निर्माण करेल - अवधूत गुप्तेनगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

सन्मिताचा आवाज महाराष्ट्राबाहेरही वेगळी ओळख निर्माण करेल असा विश्वास सुप्रसिद्ध गायक,संगीतकार,निर्माता अवधूत गुप्ते यांनी व्यक्त केला.

     कलर्स मराठी वहिनी वरील सूर नवा ध्यास नवा च्या चौथ्या पर्वाच्या विजेत्या होऊन महाराष्ट्राच्या महागायिक ठरलेल्या सौ.सन्मिता शिंदे यांचा नगरकरांच्या वतीने नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.साई द्वारका ट्रस्ट आणि आय लव नगरच्या वतीने सन्मिताचा अहमदनगर येथील बंधन लॉन्स येथे अवधूत गुप्ते यांच्या सह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.

   धनंजय जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना सन्मिता शिंदे यांचा विजय ही आम्हा नगरकरांच्या साठी खूप मोठी अभिमानाची बाब आहे.त्यामुळेच आम्ही हा सत्कार समारंभ आयोजित केला असल्याचे त्यांनी सांगितले.

    ही स्पर्धा जिंकण्यासाठी गायनाबरोबर प्रेक्षकांच्या मतांचीही आवश्यकता होती.नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या नगरच्या सन्मिता शिंदे यांना प्रेक्षकांनी वोटिंग करावे यासाठी जाहीर आवाहन देखील केले होते.सन्मितांच्या विजेते पदाने ऐतिहासिक नगर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असे गौरवोद्गार आमदार संग्राम यांनी काढले.

   अहमदनगर नगर जिल्हा नेहमीच राज्याला दिशा दर्शक ठरला आहे,आज गायनातही नगर अव्वल ठरले यासाठी सन्मिता यांचे पद्मश्री पोपटराव पवार यांनी विशेष कौतुक केले.

माजी मंत्री आणि श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते,काष्टी सेवा सोसायटीचे चेअरमन भगवानराव पाचपुते,शिवसेना शहरप्रमुख दिलीप,व्याख्याते गणेश शिंदे, सातपुते,व्हाईस 3 चित्रपटाचे निर्माते राजेंद्र शिंदे,जनार्दन लिपणे,नितेश शहा,किरण गवते,तुषार अंबाडे आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

     नागरी सत्कार सोहळ्यास उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांना दिशा फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप तांबे यांच्या संकल्पनेतून प्रत्येकी एक निंबोनीचे रोप भेट म्हणून देण्यात आले.महागायिक सौ.सन्मिता शिंदे यांनी बक्षीस म्हणून मिळालेल्या रकमेतील काही रक्कम मॉडेल व्हिलेज गोरेगाव येथील दिशा फाऊंडेशन करत असलेल्या वृक्ष लागवडीसाठी देण्याचे सत्कार सोहळ्यात जाहीर केले.सन्मिता यांचे फाऊंडेशन चे सचिव विकास काकडे,उपाध्यक्ष विकास आढाव यांनी आभार व्यक्त केले.

   सासर सोबत माहेरच्या माणसांनी माझ्या गाण्याला माझ्या प्रमाणेच जपले,यामुळे हे शक्य झाल्याचे भावुक मत सन्मिता यांनी व्यक्त केले.हा नागरी सत्कार पुढील गायनासाठी प्रेरणा अन ऊर्जा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.सत्कार सोहळ्याचे आयोजक तसेच वोटिंग करणाऱ्या सर्वांचे सन्मिता यांनी मनःपूर्वक आभार मानले.

No comments:

Post a Comment