राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या पाठपुराव्याला यश, अमरधाममधील शेडच्या पत्र्याचं काम तात्काळ पूर्ण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 11, 2021

राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या पाठपुराव्याला यश, अमरधाममधील शेडच्या पत्र्याचं काम तात्काळ पूर्ण

 राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या पाठपुराव्याला यश, अमरधाममधील शेडच्या पत्र्याचं काम तात्काळ पूर्ण


नगरी दवंडी/प्रतिनिधी
भिंगार ः अहमदनगर शहरालगत असलेल्या भिंगार येथील अमरधामध्ये अंतविधीच्या ठिकाणी असलेलय शेडच्या कामासंदर्भात भिंगार शहर राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या दिलेल्या निवेदनानंतर तात्काळ पूर्ण करण्यात आले आहे.मागील अनेक वर्षांपासून अमरधाममधील अंत्यविधीच्या ठिकाणी असलेलं शेडची पत्रे निकृष्ट झाली होती. या शेडच्या पत्र्यांना मोठ-मोठे भकदाड पडले होते. सध्या पावसाचे दिवस असल्याने अंत्यविधीसाठी नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. सदरील बाब सामाजिक न्याय विभागाचे सिद्धार्थ आढाव यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शेडवरील पत्रे तात्काळ बदलून त्या ठिकाणी नवीन पत्रे टाकण्यात यावे, असे निवेदन छावणी मंडळ प्रशासनाला दिले. तदनंतर सामाजिक न्याय विभागाच्यावतीनं सदरील कामाबाबत छावणी मंडळ प्रशासनाकडून पाठपुरावा करण्यात आला. दरम्यान, सदरील निवेदनाची दखल घेत छावणी मंडळ प्रशासनाने अमरधाममधील शेडच्या पत्र्याचे काम तात्काळ सुरु केले आहे

No comments:

Post a Comment