एनएसएसच्यावतीने वृक्षारोपण करून ‘सेल्फी विथ ट्री’द्वारे पर्यावरण सप्ताह साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 11, 2021

एनएसएसच्यावतीने वृक्षारोपण करून ‘सेल्फी विथ ट्री’द्वारे पर्यावरण सप्ताह साजरा

 एनएसएसच्यावतीने वृक्षारोपण करून ‘सेल्फी विथ ट्री’द्वारे  पर्यावरण सप्ताह साजरा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः महाविद्यालयात एनएसएस मधील विविध उपक्रमांमुळे विद्यार्थी जीवनात मूल्य संवर्धन केले जाते. कोरोनामध्ये ऑक्सीजनचे  महत्व समजले त्यासाठी निसर्ग संवर्धनात मानवाचे हित असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपण संबंधी जागृति निर्माण व्हावी म्हणून वृक्षारोपण करून पर्यावरण सप्ताह साजरा करत असल्याचे अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांनी महाविद्यालयातील एनएसएस विभागाद्वारे ’सेल्फी विथ ट्री’ कार्यक्रम प्रसंगी बोलताना सांगितले.
पर्यावरण दिवसानिमित्त आयोजित सप्ताहामध्ये आपआपल्या परिसरात झाडे लावून ’सेल्फी विथ ट्री ’ उपक्रम राबविण्यात आला.  या अंतर्गत 78 वृक्ष आपआपल्या परिसरात लावण्यात आली. यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अहमदनगर उपकेंद्र संचालक प्रो.डॉ. एन. आर. सोमवंशी, उपप्राचार्य प्रो. डॉ.बी.एम.गायकर, उप प्राचार्य डॉ.ए.व्ही.नागवडे, उपप्राचार्य डॉ.सय्यद रज्जाक, नैक कोऑर्डिनेटर डॉ.प्रितम बेदरकर, ईटीआय संचालक डॉ.शरद बोरुडे, रजिस्टार दीपक अल्हाट यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे संयोजन कार्यक्रम अधिकारी प्रा.अशोक घोरपडे यांनी केले. यासाठी उन्नत भारत अभियान संचालक प्रा.विलास नाबदे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.परकाळ भागवत, लायब्ररीयन डॉ.प्रशांत फुगणर, प्रा.फरहान शेख,प्रा.नितिन बनसोडे यांचे आयोजनात सहकार्य केले.
यासाठी आकाश खेडकर, सिमरन भूतीया, प्रतीक ढमढेरे, निलेश फसले, आरती शेडाळे, संस्कृति पारखे या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment