सुजीत झावरे पाटील यांना विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही : शेळके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 12, 2021

सुजीत झावरे पाटील यांना विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही : शेळके

 सुजीत झावरे पाटील यांना विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही : शेळके


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः
वासुंदे येथे गावठाण येथील आर. सी. सी. पाण्याची टाकी, ठुबे वस्ती येथील पाण्याची टाकी, शिरतार वस्ती पाणी पुरवठा योजना, दशक्रिया विधी शेड बांधणे, सार्वजनिक शौचालय बांधणे इ. 34 लक्ष रुपये किमतीच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन समारंभ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील तसेच पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांचे शुभहस्ते करण्यात आले.
 यावेळी बोलताना सुजीत झावरे पाटील म्हणाले की माझ्याकडे कोणतीही सत्ता नसताना  माझ्या व्यक्तिगत असलेला  संपर्कामुळे आज अनेक माझे मित्र विविध पदांवर कार्यरत आहेत ते नेहमीच  मला विकास कामांसाठी मदत करत असतात त्या माध्यमातून मी तालुक्यात ग्रामीण भागामध्ये विकास कामे करत आहे.
 यावेळी पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके म्हणाले की जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी पारनेर तालुक्यात खर्‍या अर्थाने  विकास कामांच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण कामे मार्गी लावली आहेत सुजित झावरे यांना मी कोणताही निधी तालुक्यात विकास कामे करत असताना कमी पडू देणार नाही. तालुक्यात विविध पाणीपुरवठा योजनांसाठी  स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण जलशुद्धीकरण योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देणार आहे. पारनेर तालुक्यात सुरू असलेली विकासाची गंगा खंडित पडू देणार नाही असे शेळके म्हणाले.
यावेळी पारनेर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन बाबासाहेब खिलारी, वडगाव सावताळचे सरपंच मिठु शिंदे, रवींद्र पाडळकर, सरपंच सुमन सैद, उपसरपंच शंकर बर्वे, रणजित पाटील, दिलीप पाटोळे, भाऊसाहेब सैद, लहानू झावरे, बाळासाहेब झावरे पाटील, बाळासाहेब झावरे, सुदाम शिर्के, बाळासाहेब शिंदे, पोपट झावरे, किसन वाबळे, पोपट हिंगडे, विठ्ठल झावरे, सचिन सैद, सुदाम भालके, सचिन साठे, शिवाजी रोकडे, बाळासाहेब टोपले, तोफिक राजे, गणेश झावरे,निखिल दाते, अशोक वाळुंज, ग्रामसेवक लोंढे तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

No comments:

Post a Comment