प्रबोधन कार्यात मिळणारे मानधन भाळवणी येथील आरोग्य मंदिरास देणार !डॉ.सुनील गंधे
नगरी दवंडी
पारनेर प्रतिनिधी:
समाज परिवर्तनाचे कार्य करत असताना आठवड्यातील तीन ते चार दिवस दशक्रिया,वर्षश्राद्ध, वर्धापन दिन किंवा कुठलाही धार्मिक सामाजिक कार्यक्रम असल्यास समाज प्रबोधनकार म्हणून अनेक ठिकाणी व्याख्याने प्रवचने करत समाज प्रबोधन करणारे डॉक्टर सुनील गंधे यांना जे मानधन मिळते त्या मानधनातून गोरगरीब जनतेला अल्पशी मदत मिळावी हा माणस ठेवत रुग्णसेवेसाठी झपाटलेल्या या व्यक्तिमत्त्वाने संपूर्ण मानधनाची रक्कम ही मा.शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिर भाळवणी येथे देणार असल्याचा संकल्प करत येणारे मानधन हे कोविड सेंटरकडे सुपूर्द करत असतात .
कोरोना विषाणूचा दाह सर्वत्र अनुभवायास मिळत असताना पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी भाळवणी येथे सुरु केलेल्या या आरोग्य मंदिरात महाराष्ट्रासह देश विदेशातून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत जमा झाली भाळवणी येथे अकराशे बेडचे हे कोविड सेंटर ज्यात आत्तापर्यंत हजारो रुग्ण उपचार घेऊन बरे झाल्यावर सुखरूप आपापल्या घरी गेले आहे.कोविड सेंटर मध्ये आजतागायत एकही रुग्ण दगवला नाही,असा अद्भुत चमत्कार या देवळात घडला.
उत्तम व्यवस्थापन,सकस आहार,नित्य योगा,रुग्णांबरोबर आपुलकिच नाते,दिर्घ अनुभवी कुशल व तज्ज्ञ खाजगी डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांची विनामूल्य समर्पित सेवा,मा.लोकनेते आ.निलेशजी लंके साहेबांचं व्यक्तिगत लक्ष,कोविड सेंटर एक कुटुंब व आमदार साहेब एक कुटुंबप्रमुख अशा भावनेने निशुल्क कामे करणारे शेकडो कार्यकर्ते तन-मन-धनाने मदत करणारे असंख्य सहकारी,रुग्नांना बरे वाटण्यासाठी वाट्टेल ते करण्याचा सर्वांचा मनापासून प्रयत्न या व अशा कारणानी हे कोविड सेंटर जगाच्या पाठीवर प्रत्येकाचा कुतुहलाचा व कौतुकाचा विषय बनला आहे.
देशाच्या कनकोपर्यातुन शेकडो लोक खास कोविड सेंटरचे कार्य पाहण्यासाठी रोज भेट देतात.कोरोनाची भीती घालवन्या बरोबरच रुग्नाचे समुपदेशन, मनोरंजन, आत्मबल सवर्धन तसेच आपुलकीची वागणूक हे या केंद्रातील नित्याच वेळापत्रक झाले आहे.
आशा या आरोग्य मंदिरात अगदी पहिल्या दिवसा पासून आ. लंके यांच्या बरोबरीने चोवीस तास आरोग्य सेवा देणारे डॉ.सुनील गंधे हे अविरतपणे सेवा देत आहेत.
कमी तेथे आम्ही या सुत्राने कामं करणारे डॉ.गंधे हे दोन महिन्यापासून आपले स्वतःच हॉस्पिटल बंद ठेवून या केंद्रात चोवीस तास राबतहेत.आरोग्य सेवेबरोबरच समाज प्रबोधन कार्यासाठी ते प्रसिध्द आहेत.
हिवरे कोरडा गावात कै.बाबासाहेब अडसूळ यांच्या दशक्रिया विधिनिमित्त डॉ. सुनील गंधे यांनी अध्यात्म शास्रात कोरोनाचा संधर्भ या विषयावर जे प्रवचन केले त्या प्रित्यर्थ अडसूळ परिवाराने त्यांना बंद पाकिटात काही रक्कम मानधन म्हणून दिली.ते पाकीट तसेच त्यांनी आ.निलेशजी लंके यांच्या कडे कोविड सेन्टरला मदत म्हणून सुपूर्द केले.
यावेळी हिवरे कोरडा गावाचे सरपंचपती दत्ता कोरडे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबा तरटे,राहुल झावरे,बाळासाहेब खिलारी,संदीप भागवत,जितेश सरडे, पोटघन मेजर,श्रीकांत चौरे, सुरज भुजबळ, मुकुंद शिंदे,संदीप रोहोकले,ईश्वर जपे, प्रमोद गोडसे यांच्या सह या आरोग्य मंदिरात सेवा देणारे निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.यांच्या या उपक्रमाच आमदार निलेश लंके यांनी अभिनंदन तर केलच शिवाय ते देत असलेल्या आरोग्य सेवेच कौतुकही केल.
चौकट :
अध्यात्मिक कार्याचा आपण रुपया सुद्धा घेत नाही.लोक जे मानधन देतात ते आपण सामाजिक कार्यासाठी वापरतो.मा.आमदार निलेश लंके यांनी आरोग्य सेवेचे जे दालन सुरु केलय याचा रोजचा खर्च भरपूर आहे.कितीही मदत आली तरी ती कमीच पडेल असे कामं या आरोग्य मंदिरात चालत आसते.आपण या केंद्रात रुग्णांना जी सेवा देतो त्यात खूप समाधान मिळते.हजारो रुग्ण आम्ही बरे करु शकलो याचा आम्हाला आनंद वाटतो.आरोग्य उपक्रमासाठी आपल्याला मिळणारे संपूर्ण मानधन देण्याचा जो सकल्प केला तो मी नक्कीच पूर्ण करणार आहे.
डॉ.सुनील गंधे
No comments:
Post a Comment