श्रीगोंदा नगरपालिका उभारणार सुसज्ज रुग्णालय - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 12, 2021

श्रीगोंदा नगरपालिका उभारणार सुसज्ज रुग्णालय

 श्रीगोंदा नगरपालिका उभारणार सुसज्ज रुग्णालय


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा नगरपालिकेमार्फत श्रीगोंदा शहरात 100खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचे माहिती माजी नगराध्यक्ष गटनेते मनोहर पोटे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे प्रसिद्ध केली.
पोटे यांनी सांगितले कि अडीच वर्षापूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात देखील रुग्णालय उभारणीचे वचन दिले होते त्यासाठी लागलीच पाठपुरावा देखील सुरू केला होता मात्र आचारसंहिता,लॉकडाऊन यात खूप कालावधी गेला परंतु कोरोना दुसर्‍या लाटेत श्रीगोंदा शहरातील नागरिकांची उपचारासाठी मोठी धावपळ झाली,वेळेत उपचार मिळाले नाही हे पाहता नगरपालिकेने शहरात सुसज्ज रुग्णालय उभारणीचा निर्णय घेतला असून त्या अनुषंगाने कार्यवाही लवकर करून महाविकास आघाडी सरकार कडे पाठपुरावा करून कमी कालावधीत मंजुरी व तत्सम कामे करून रुग्णालय उभारले जाईल असा विश्वास पोटे यांनी व्यक्त केला. पोटे यांनी सांगितले की  लॉकडाऊन काळात आपण सहकारी नगरसेवक यांनी आरोग्य विभाग मार्फत जागरूकतेने काम केले.तसेच विविध विकास कामे सुरू असून,पाणी पुरवठा,विज बाबत जागरूकता आहे.
शहर विकासाला आपले प्राधान्य होते यापुढेही राहील हे आपण कृतीतून सिद्ध केलेच रुग्णालय उभारणी देखील करून शहरवासीयांना उपचार मिळवून देऊ

No comments:

Post a Comment